Avatar The Way Of Water : जेम्स कॅमेरॉनचा (James Cameron) बहुचर्चित 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा आता प्रेक्षकांना हिंदीतही पाहायला मिळणार आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी हा सिनेमा सज्ज आहे.


'अवतार : द वे ऑफ वॉटर' डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार रिलीज!


'अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. आता बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रेक्षकांना इंग्रजीसह तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या 7 जूनपासून हा सिनेमा प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात. 






'अवतार 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन  (Avatar 2 Box Office Collection)


मीडिया रिपोर्टनुसार, 'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे. जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. या सिनेमाने 'अॅव्हेंजर्स एंडमेग' आणि 'टायटॅनिक' या बहुचर्चित सिनेमांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. आजही जगभरात 'अवतार 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 


जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची नाळ एका अद्भुत दुनियेशी जोडली गेली आहे. समुद्र, समुद्रातील प्राणी त्यांच्यातील विविधता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी या सिनेमाने 20 हजार 268 कोटींचा गल्ला जमवला होता. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'अवतार द वे ऑफ वॉटर'


'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमात सॅम वर्थिंग्टन (Sam Wothington), जो सलदाना (Zoe Saldana) मुख्य भूमिकेत आहेत. तसेच जिओव्हानी रिबिसी, जोएल डेव्हिड मूर, दिलीप राव, मॅट जेराल्ड, जॅक चॅम्पियन, एडी फाल्को, ब्रेंडन कॉवेल, मिशेल येओहह आणि जेमेन क्लेमेंट हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Avatar 2 Beats Titanic : जेम्स कॅमरॉनच्या 'अवतार 2'ने रचला इतिहास; बॉक्स ऑफिसवर 'टायटॅनिक'चाही तोडला रेकॉर्ड