Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
21 ते 23 जानेवारी दरम्यान होणार शाही विवाहसोहळा
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा शाही विवाहसोहळा 21 ते 23 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. लवकरच ते लग्नपत्रिकांचं वाटप करायला सुरुवात करणार आहेत. लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं असल्याने आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. पण अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे संगीत, मेहंदी, हळद असे सर्व कार्यक्रम होणार आहेत. दाक्षिणात्य रितीरिवाजानुसार ते लग्न करणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील 'जहान' बंगल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी यांनी लग्नासंदर्भात भाष्य केलं होतं. मीडियाला माहिती देताना ते म्हणाले होते,"लग्न लवकरच होणार आहे".
अथिया-केएल घेणार ब्रेक!
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अथियाने 2015 साली 'हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आजवर अनेक सिनेमांत ती महत्तवाच्या भूमिकेत झळकली आहे. आता लग्नासाठी दोघेही आपापल्या कामांमधून खास ब्रेक घेणार आहेत.
संबंधित बातम्या