Athiya Shetty And KL Rahul : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल (KL Rahu) लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. अशातच सुनील शेट्टीने त्यांच्या लग्नासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. 


सुनील शेट्टी सध्या 'धारावी बॅंक' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला,"अथिया आणि केएलचं लग्न लवकरच होईल". सुनीलच्या उत्तरामुळे अथिया आणि केएल लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


सुनील शेट्टी याआधी एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले होते,लग्न करण्याचा निर्णय हा मुलांचा आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की ते लग्न करतील. राहुल सध्या आशिया वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूरमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे कामांमधून त्यांना ब्रेक मिळाला की ते लग्न करतील". 






अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार केएल राहुल आणि अथिया शेट्टी दोघेही एकत्र एकाच घरात शिफ्ट झाले आहेत. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना वांद्रे येथील कार्टर रोडवर एक घर घेतले आहे. ही जोडी त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.


अथियाने 2015 साली 'हिरो' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या सिनेमांत अथिया महत्त्वाच्या भूमिकेत होती. अथियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


संबंधित बातम्या


Athiya shetty KL Rahul Wedding : तीन महिन्यानंतर के. एल राहुल आणि अथिया बांधणार लग्नगाठ? सुनील शेट्टी म्हणतो...