Arjun Kapoor :  रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) आगामी बहुप्रतिक्षीत 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यात खलनायकी भूमिका साकारणार असून या चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकची जोरदार चर्चा झाली. या लूकमुळे चित्रपटातील खलनायकी भूमिका कशी असेल याबाबत चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे 'सिंघम अगेन'मुळे एक वर्तुळ पूर्ण झाले असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले. 


अर्जुन कपूरने म्हटले की, “इशकजादे, औरंगजेब यांसारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारून मी सिनेइंडस्ट्रीत माझ्या करिअरची सुरुवात केली. इतक्या वर्षांनंतर मी पुन्हा सिंघममध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. आदित्य चोप्रांचा मी आभारी आहे, त्यांनी माझ्यातील खलनायकी भूमिका साकारण्याची क्षमता पाहिली आणि संधी दिली. आता रोहित शेट्टीचाही आभारी असल्याचे अर्जुनने म्हटले. रोहितने त्याच्या महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित कॉप युनिव्हर्स चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. रोहित शेट्टीने माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि प्रत्येक टप्प्यावर तो मार्गदर्शक ठरला असल्याची भावना अर्जुन कपूरने व्यक्त केली. 


अर्जुनने सांगितले की, "हे दोघेही माझ्या चित्रपट कारकिर्दीत खरे मार्गदर्शक ठरले आहेत. मी सिंघम अगेनमध्ये खलनायकाची भूमिका करून लोकांची मने जिंकू शकतो असा विश्वास रोहितने माझ्यावर दाखवला असल्याचे त्याने म्हटले.  रोहित शेट्टीच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करणे हा रोमाचंकारी अनुभव आहे. यामुळे त्याला अभिनेता म्हणूनही प्रयोग करण्याची संधी मिळाली असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले. सिंघम अगेनमध्ये पोलिसांच्या कट्टर शत्रूची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी मोठी संधी असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले. 






रोहित शेट्टीला माझ्यात खलनायक दिसला... 


अर्जुन कपूरने म्हटले की, मला संधी देणाऱ्या सगळ्या दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचा आभारी आहे. त्यांनी रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी दिली. रोहित शेट्टी सारख्या दिग्गज फिल्ममेकरला त्याच्या सिंघम अगेनसाठीचा खलनायक माझ्यात दिसला. चित्रपट रिलीज झाल्यावर माझ्या कामावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले. 


इतर संबंधित बातम्या :