मुंबई : निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सेन्सॉर बोर्ड पुन्हा एका आमनेसामने आले आहेत. 'उडता पंजाब'पाठोपाठ नवाझुद्दीन सिद्दीकीच्या 'हरामखोर' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने सर्टिफीकेट देण्यास नकार दिला आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाच्या विषयावर आक्षेप नोंदवला आहे.

 

 

'हरामखोर' या सिनेमात 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी आणि तिच्या शिक्षकामधील प्रेमसंबंधाववर भाष्य करण्यात आलं आहे. समाजात शिक्षकांना मानाचं स्थान असतं. मात्र अशा प्रकारचे नातेसंबंध सिनेमात दाखवल्यामुळे शिक्षकांविषयी चुकीची समज पसरवला जाईल. सिनेमात टीनएज मुलगी आणि शिक्षकांमध्ये अवैध संबंध दाखवण्यात आले आहेत. शिवाय सिनेमात मुलांच्या तोंडी अश्लील डायलॉगही आहेत. तसंच त्यांचे शारीरिक हावभावही आक्षेपार्ह आहे. ही कारणं पुढे करत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला जात आहे.

 

 

नुकताच पंधराव्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअर करण्यात आला. यातील भूमिकेसाठी नवाझुद्दीन सिद्दीकीला बेस्ट अॅक्टरचं अवॉर्डही देण्यात आलं. शिवाय 'मामी' फिल्म फेस्टिव्हलमध्येही गेल्यावर्षी हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

 

 

त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने आता चित्रपटाचे निर्माते एफसीएटीचा दार ठोठावण्याच्या विचारात आहे.