मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेला बॉलिवूड दिग्दर्शक करण जौहर याच्याकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. इतकंच नाही, तर अंकिता लोखंडेने करण जौहरची ऑफर धुडकावल्याचंही बोललं जात आहे. दिग्दर्शक करण जोहरने अंकिता लोखंडेला स्टुडंट ऑफ द इयर 3 ची ऑफर दिली होती, पण तिने ती नाकारली होती, अशी बातमी सध्या समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेला 'स्टुडंट ऑफ द इयर 3'ची ऑफर मिळाली होती. SOTY3 हा चित्रपट नसून वेब सिरीज असेल. पण, अंकिता लोखंडेने ही संधी नाकारली. याचं कारण फक्त तिलाच माहीत आहे.


अंकिता लोखंडेला करण जौहरकडून संधी


अंकिता लोखंडेला स्टुडंट ऑफ द इयर 3 मध्ये महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी तिने नाकारली, अशा बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. करण जोहर SOTY वेब सीरिज बनवण्याच्या तयारीत असून बिग बॉसमधील अंकिताच्या व्यक्तिमत्त्वाने तो खूप प्रभावित झाला होता. अंकिताची लोकप्रियता पाहून त्याने तिला कास्ट करण्याचा निर्णय घेतला होता, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात होतं. पण, आता याबाबतीत मोठा खुलासा झाला आहे.


अंकिताला स्टुडंट ऑफ द इयर 3 ची ऑफर?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'होय, अंकिताला 'स्टुडंट ऑफ द इयर 3' साठी अप्रोच करण्यात आले होते. तिला ऑफर केलेल्या भूमिकेबद्दल मला माहिती नाही, परंतु तिला निश्चितपणे विचारण्यात आले की ती SOTY3 फ्रँचायझीचा भाग असू शकते का. मात्र, त्यांनी ही ऑफर नाकारली. या मागचे कारण कोणालाच माहीत नाही. या अफवांचे खंडन करताना, अभिनेत्रीने पुष्टी केली की अशी कोणतीही ऑफर आली नाही. या बातम्या खोट्या आहेत.


नेमकं सत्य काय?


अंकिता लोखंडेला करण जोहरने कोणत्याही प्रोजेक्टसाठी संपर्क केलेला नाही. दरम्यान, अंकिता लोखंडेला करण जोहरकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नसल्याचं अंकिता लोखंडेच्या टीमने सांगितलं आहे. त्यामुळे स्टुडेंट ऑफ द इयरसाठी करण जौहरची ऑफर अंकिता लोखंडेने नाकारली, ही फेक न्यूज आहे.


भन्साळींचा बाजीराव मस्तानी चित्रपटही नाकारला


अंकिता लोखंडेला संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपटाचीही ऑफरही आली होती, पण तिने तो करण्यास नकार दिला होता. अंकिता त्यावेळी सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. आपल्या नात्याला प्राधान्य देण्यासाठी तिने चित्रपट करण्यास नकार दिला. खुद्द अंकिताने मुलाखतीत याचा खुलासा केला होता. याबाबत अंकिताने तिला कोणताही पश्चाताप नसल्याचंही तिने सांगितलं होतं. याशिवाय, अंकिताला फराह खानच्या हॅप्पी न्यू एयर चित्रपटाचीही ऑफर होती, जी तिने नाकारली.