Amrita Rao : सुभाष कपूर दिग्दर्शित 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. दरम्यान या सिनेमात डबल धमाका दिसणार आहे. कारण हर्षद वारसी आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) या दोघांचीही जोडी या सिनेमात दिसणार आहे. जॉली एलएलबीच्या पहिल्या भागात अर्शद वारसी (Arshad Warsi) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच दुसऱ्या भागात अक्षय कुमार आणि हुमा कुरेशीची जोडी पाहायला मिळाली. दोन्ही सिनेमात सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत पाहायला मिळाले. पण आता तिसऱ्या भागात पुन्हा एकदा अमृता रावची (Amrita Rao) एन्ट्री होणार असल्याची माहिती सांगण्यात समोर येत आहे. 


'हिंदुस्तान टाइम्स' च्या वृत्तानुसार, जॉली एलएलबी 3 सिनेमात हर्षद वारसीच्या बायकोच्या भूमिकेत अमृता राव दिसणार असून या सिनेमातूनच ती कमबॅक करणार आहे. या तिसऱ्या भागाचं शुटींग राजस्थानमध्ये सुरु झालं आहे. जॉली एलएलबीच्या तिसऱ्या भागातही अमृता राव दिसली होती. या सिनेमात तिने हर्षद वारसीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता रावचं देखील शेड्युलमध्ये नाव आहे. परंतु अद्याप यावर अमृताकडून कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यात आलेलं नाहीये. 


राजस्थान, दिल्ली आणि मुंबईत शुटींगला सुरुवात


राजस्थानमध्ये सुरु झालेल्या शुटींगविषयी सूत्रांच्या हवल्याने बोलताना म्हटलं की, हे शूटिंग राजस्थानमधील अत्यंत दुर्गम भागात झाले आहे. ठिकाण असे होते की त्या रस्त्यावरून एकही वाहन जाऊ शकत नसल्यामुळे तेथे जाण्यासाठी प्रत्येकाला चालत जावे लागत होते. आता शूटिंग मुंबईत होत आहे. यानंतर काही सीन दिल्लीत शूट होणार आहेत.


जॉली एलएलबी 3 विरोधात तक्रार दाखल


महिनाभरापूर्वी हा चित्रपटही वादात सापडला होता. जॉली एलएलबी 3 विरोधात अजमेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. चित्रपटात न्यायालयीन प्रतिष्ठेला कलंक लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे त्याचे शूटिंग थांबवावे, असे म्हटले होते. याशिवाय वकील आणि न्यायाधीशांचीही खिल्ली उडवली जात आहे. याबाबत तक्रारही करण्यात आली होती. 






ही बातमी वाचा : 


Chandrababu Naidu: रामोजी राव यांच्या पार्थिवाला चंद्राबाबूंनी दिला खांदा; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार