Kaun Banega Crorepati : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांच्या ज्ञानात भर करणारा कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) होय. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचे महानायक आणि 'कौन बनेगा करोडपती'चे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 'कौन बनेगा करोडपती 15'ची (Kaun Banega Crorepati) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'कौन बनेगा करोडपती 15'च्या शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. शूटिंगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे,"केबीसी (KBC) पुन्हा सुरू होणार". तसेच आणखी एक ट्वीट शेअर करत त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"केबीसी".
'कौन बनेगा करोडपती 15'चा एक प्रोमो काही दिवसांपूर्वी आऊट करण्यात आला होता. या नव्या पर्वात काही नवे नियम असणार आहेत, असे म्हटले जात आहे. आता 'कौन बनेगा करोडपती 15'च्या रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे.
'कौन बनेगा करोडपती'बद्दल जाणून घ्या...
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. या कार्यक्रमामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. कार्यक्रमातील एक पर्व सोडून बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले आहेत. केबीसीचं तिसरं पर्व बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) होस्ट केलं होतं. 'कौन बनेगा करोडपती 15' प्रेक्षकांना सोनी वाहिनीवर पाहायला मिळेल.
'कौन बनेगा करोडपती 15' सह अमिताभ बच्चन सध्या त्याच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Project K) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या