Amitabh Bachchan Sunny Deol : दिग्दर्शक मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी आपल्या सिने कारकिर्दीत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. त्याशिवाय, काही चित्रपट हे आजही लोकप्रिय आहेत. मनमोहन देसाई यांनी अॅक्शन, क्राईम, थ्रिलर, लव्ह स्टोरी अशा विविध धाटणीचे चित्रपट केले. त्यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले. बहुतांशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
मनमोहन देसाई यांनी पहिल्यांदा अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्यासोबत 'परवरिश' चित्रपट केला. परवरिश हा चित्रपट 1977 मधील दुसरा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. तिकीटबारीवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाने त्याकाळी 1.66 कोटींची कमाई केली होती. तर, वर्ल्डवाइड 7 कोटींची कमाई केली होती.
परवरिशचा रिमेक
अमिताभ बच्चनच्या या ब्लॉकबस्टर सिनेमाने सनी देओलचेही नशीब पालटले. जवळपास 10 वर्षानंतर या चित्रपटाचा रिमेक झाला. परवरिशच्या रिमेक चित्रपटाचे नाव होते 'पाप की दुनिया'. हा चित्रपट वर्ष 1988 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिबू मित्रा यांनी केले होते. या चित्रपटालाही लोकांनी तुफान प्रतिसाद दिला. हा त्या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला.
सनी देओलचे नशीब पालटले
'पाप की दुनिया' हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर सनी देओलचेही नशीब बदलले. 'पाप की दुनिया' हा चित्रपट 2.40 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने 9 कोटींच्या आसपास कमाई केली होती. वर्ष 1988 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट होता.
'परवरिश' आणि 'पाप की दुनिया'ची कथा पूर्णपणे सारखीच आहे. जरी त्याचे पात्र बदलले होते. 'पाप की दुनिया'मध्ये प्राणने शम्मी कपूर, सनी देओलने विनोद खन्ना, चंकी पांडेने अमिताभ बच्चन आणि डॅनीने अमजद खानची भूमिका साकारली होती. नीतू सिंगची भूमिका निलम कोठारी यांनी केली होती.
सनी देओलने हा चित्रपट वडील धर्मेंद्र यांच्यामुळे केला होता. सनी देओल या चित्रपटात काम करणार नव्हता. अमिताभ यांची भूमिका असलेला रिमेक चित्रपट फ्लॉप झाला तर करिअर बुडणार असल्याची भीती सनी देओलला होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट चित्रपट ठरला.