Amaran Box Office Collection Day 1: दिवाळीच्या (Diwali) दिवशी अजय देवगणचा (Ajay Devgan) मल्टीस्टारर सिंघम अगेन (Singham Again) आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. अशातच बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. मात्र, या दोन चित्रपटांच्या ब्लॉकबस्टर ओपनिंगपूर्वीच साऊथच्या (South Movie) अमारन चित्रपटानं बंपर ओपनिंग मिळवली आहे. दिवाळीच्या दिवशी म्हणजेच, 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या अभिनेता शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांच्या चित्रपटानं भारतात 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर जगभरात हा आकडा 30 कोटींच्या पुढे गेला आहे.


बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacknilk च्या डेटानुसार, पॉझिटिव्ह रिव्यूसह, अमारननं भारतात 21.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कलेक्शन 30 कोटींच्या पुढे गेलं आहे. तर चित्रपटाचं बजेट 130 कोटी आहे. आतापर्यंतचा चित्रपटाचा डंका पाहिला तर, हा चित्रपट हॉलिडे विकेंडवर हा आकडा अगदी सहज पार करेल. 


राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित अमारन हा शिवकार्तिकेयनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 22 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाल्याचं बोललं जात आहे.


अमारन चित्रपटाबाबत सांगायचं झालं तर, भारतीय लष्कराच्या राजपूत रेजिमेंटचे एक कमिशन्ड अधिकारी मेजर मुकुंद वरदराजन यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांना 44 व्या राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये प्रतिनियुक्तीवर असताना दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. या चित्रपटात शिवकार्तिकेयननं मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात साई पल्लवी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Filmstar Life : आई-वडिल 'सुपरस्टार', पण दोन्ही मुलं 'सुपरफ्लॉप'; एका मुलानं तर बुडवली 100 कोटींची फिल्म, ओळखलंत का?