Ali Zafer On Javed Akhtar : बॉलिवूडचे लोकप्रिय गायक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात "26/11 च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत", असं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्याचं भारतीय मंडळी कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानमधील कलाकार टीका करत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अली जफरने '942 अ लव्ह स्टोरी' या सिनेमातील 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या गाण्याचं प्रचंड कौतुक केलं होतं. या गाण्याचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. अलीने या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं,"माझं आवडतं गाणं एका दिग्गजाने लिहिलं आहे". अलीने जावेद अख्तर यांचं कौतुक केल्याने पाकिस्तानी मंडळींनी त्याला ट्रोल केलं होतं.
अली जफरची प्रतिक्रिया काय आहे?
अली जफरने लिहिलं आहे,"पाकिस्तानी असल्याचा मला अभिमान आहे. कोणताही पाकिस्तानी आपल्या देशाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचं कौतुक करणार नाही. दहशतवादासारख्या घटनांमुळे पाकिस्तानला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. आता जावेद अख्तर यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कला आणि संगीत लोकांना एकत्र आणण्याचं एक चांगलं माध्यम आहे, यावर माझा विश्वास आहे".
जावेद अख्तर काय म्हणाले होते?
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत. एखाद्या भारतीयाने याबद्धल छेडलं तर वाईट वाटू देऊ नका.'
'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :