Akshay Kumar Tests Positive For COVID 19 :  अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. मात्र, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) हा मात्र, या विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाही. अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार आता या विवाह सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. 


'सरफिरा' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. केवळ अक्षय कुमारच नाही तर 'सरफिरा'च्या टीममधील आणखी काही लोकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


अक्षय कुमारला कोरोनाची लागण... 


'सरफिरा'च्या प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्राने हिंदुस्तान टाईम्स सिटीला ही माहिती दिली आहे. सूत्राने सांगितले की, “अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. मग त्याला समजले की, प्रमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची कोविड चाचणी केली आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. 






अक्षय कुमारने स्वत:ला ठेवले विलगीकरणात...


सूत्रांनी पुढे सांगितले की, कोरोना चाचणी पॉझिटीव्ह  आल्यानंतर आता अक्षय कुमार 'सरफिरा' चित्रपटाचे कोणतेही प्रमोशन करणार नाही. त्याशिवाय अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यातही  हजेरी लावणार नाही. अक्षय कुमारने जबाबदार नागरीक म्हणून कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समजल्यानंतर स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, औषधोपचार सुरू असून अक्षय कुमार क्वारंटाईन आहे. 


आजच रिलीज झालाय 'सरफिरा'


ज्या 'सरफिरा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली तो चित्रपट आजच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत राधिका मदन आहे.


इतर महत्त्वाची बातमी :