Maidaan Teaser:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. नुकताच त्याचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता त्याचा मैदान (Maidaan) हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. अजयनं सोशल मीडियावर मैदान या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजयनं मैदान या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

'मैदान' हा चित्रपट भारतीय फुटबॉल टीमवर आधारित आहे. या चित्रपटातील अजयची व्यक्तिरेखा भारतीय फुटबॉलचे जनक म्हणून ओळखले जाणारे महान प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. रहीम हे 1950 ते 1963 पर्यंत भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे मॅनेजर होते. या काळातील कथाही या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 

अजयनं शेअर केला टीझर

अजयनं मैदान चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'मैदान में उतरेंगे ग्याराह लेकिन दिखेंगे एक.' अजयनं शेअर केलेल्या टीझरला अनेकांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. 

पाहा टीझर

मैदान हा सिनेमा 23 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2022 मध्ये अजयने 'दृश्यम 2' सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. त्यामुळे आता त्याचे आगामी सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपल्या जादू दाखवण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

डबल धमाका करण्यासाठी अजय सज्ज!

अजय देवगनचा बहुचर्चित 'भोला' (Bholaa) हा सिनेमा 30 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'भोला' या सिनेमासोबत अजय 'मैदान' या सिनेमाचा टीझरदेखील रिलीज करण्यात येणार आहे. एकंदरीतच डबल धमाका करण्यासाठी अजय सज्ज आहे. अजयच्या भोला या चित्रपटात अजयसोबतच तब्बूनं देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगणने सांभाळली आहे. अजयच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 30 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!