Shaitan Release Date: अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी सिंघम अगेन (Singham Again) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे, या  मल्टिस्टारर चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच आता अजयच्या आणखी एका आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अजय देवगन हा 'शैतान' (Shaitan) या हॉरर चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.


'शैतान' ची स्टार कास्ट


'शैतान' या चित्रपटात अजय देवगनसोबत आर माधवन आणि अभिनेत्री ज्योतिका हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'शैतान' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन अजयनं या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. अजय देवगनने  सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, - 'सैतान 8 मार्चला थिएटरमध्ये येत आहे' अजयनं शेअर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 


काळ्या जादूवर आधारित असणारा 'शैतान'


'शैतान' हा सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला हा हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटात भारतात काळी जादू कशी होते? त्याचा काय परिणाम होतो? हे दाखवलं जाणार आहे. हा चित्रपट जिओ स्टुडिओ, देवगन फिल्म आणि पेनारोम स्टुडिओच्या बॅनरखाली बनवला जात आहे. कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 8 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका हे तिघे पहिल्यांदाच शैतान चित्रपटामध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 






अजय देवगनचे आगामी चित्रपट


 'शैतान' आणि  'सिंघम अगेन' या चित्रपटातून अजय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   'सिंघम अगेन' या रोहित शेट्टीच्या चित्रपटात   रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर देखील  दिसणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Koffee With Karan 8: लेकीच्या ट्रोलिंगबाबत सिंघमचं मोजक्या शब्दात उत्तर, निसाच्या बॉलिवूज डेब्यूबाबत अजय म्हणाला...