Aishwarya Rai Bachchan Moved Out of the Bachchan House Jalsa : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्याही चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता ऐश्वर्याने सासरचं घर सोडलं असल्याचं समोर आलं आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असून लवकरच ते घटस्फोट घेणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या फक्त लेक आराध्या बच्चनसोबतच (Aaradhya Bachchan) दिसून आली आहे. ऐश्वर्याने आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'जलसा' (Jalsa) बंगला सोडला असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्या राय सध्या आराध्यासोबत तिच्या माहेरी आई वृंदा रायसोबत राहत आहे.
ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चन विभक्त होणार नाहीत
'जूम'च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय बच्चनने 'जलसा' हे बच्चन हाऊस सोडलं असून ती वेगळी राहत आहे. ऐश्वर्या वृंदा राय यांच्या घरी राहत असली तरी अभिषेक बच्चनसोबतही ती तेवढाच वेळ घालवत आहे. बच्चन हाऊस सोडलं असलं तरी अभिषेक मात्र तिच्यासोबत आहे. ऐश्वर्या आणि जया बच्चन बोलत नसल्याचं म्हटलं जात आहे. श्वेता बच्चन जलसामध्ये राहायला आल्याचं ऐश्वर्याला पटलेलं नाही. अभिषेक मात्र पत्नी ऐश्वर्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बिभक्त होणार नाहीत हे चित्र स्पष्ट आहे.
अमिताभ बच्चन यांचा नातू अहस्त्य नंदाने 'द आर्चीज' (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला ऐश्वर्या राय बच्चनने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने आराध्या, अभिषेक आणि बिग बींसोबत फोटोही क्लिक केले.
ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये कोणाचं नेटवर्थ सर्वाधिक (Aishwarya Rai Abhishek Bachchan Net worth)
ऐश्वर्याची संपत्ती अभिषेकपेक्षा खूपच जास्त आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर म्हणजेच 826 कोटी रुपये आहे. तर अभिषेक बच्चनची एकूण संपत्ती 203 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या सिनेमांसह जाहिरांतीमधून चांगलीच कमाई करते. एका सिनेमासाठी ती 10 ते 12 कोटी रुपये आकारते. तर जाहिरातींमधून वर्षाला ती 80-90 कोटींची कमाई करते. एका जाहिरातीसाठी दिवसाला ती सहा-सात कोटी रुपयांचा मानधन घेते. अभिषेकनं देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
संबंधित बातम्या