Aishwarya Rai Bachchan Car Hit : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐश्वर्या रायच्या कारला बेस्ट बसने मागून धडक दिल्याची घटना मुंबईत घडली. या अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नाही. तसेच तिच्या कारचेही कोणतेही नुकसान झाले नाही. असं असलं तरी ऐश्वर्याचे चाहते तिच्या सुरक्षेसंबंधी टेन्शनमध्ये आले होते.
ऐश्वर्याच्या कारला धडक
ही घटना 26 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान घडली. या संबंधी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जुहूमध्ये एका मोठ्या लाल रंगाच्या बेस्ट बसने ऐश्वर्याच्या कारला मागून धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर ऐश्वर्याचा बॉडीगार्ड कारमधून बाहेर येतो. मात्र, ऐश्वर्याच्या कारचे कोणतेही गंभीर नुकसान झालेले दिसले नाही. थोड्या वेळानंतर ऐश्वर्या रायची कार घटनास्थळावरुन निघून जाते.
अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी ऐश्वर्या कारमध्ये नव्हती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी हा एक दिलासा ठरला.
यूजर्सच्या कमेंट्स
अपघाताची ही बातमी समोर आल्यानंतर ऐश्वर्याच्या चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. एका यूजरने लिहिले की, ऐश्वर्या राय वाईट काळातून जात आहे, आधी घटस्फोटाच्या अफवा आणि आता ही घटना. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, या बस चालकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. भारतातील बस चालकांना गाडी कशी चालवायची याची माहिती नाही असं एका यूजरने मत व्यक्त केलं.
घटस्फोटाच्या अफवा
ऐश्वर्या राय अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि दोघे घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत अशीही चर्चा सुरू होती. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांमध्येही तणाव असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. गेल्या वर्षी, 17 वर्षांच्या संसारानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या हे एकमेकांपासून काडीमोड घेणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चांच्या दरम्यान काळानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले. अभिषेकने आपली अंगठी दाखवत आपण अद्याप एकत्रित असल्याचे संकेत दिले. अभिषेकने सर्व अफवा फेटाळून लावल्या होत्या.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा मुलगा कोणार्कच्या लग्नामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय एकत्रित दिसले. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
ही बातमी वाचा:
