AI Photos Of Actresses In Old Age: साहिद नावाचा AI (Artifical Intelligence) एंथुजियास्ट हा सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असतो. ते फोटो AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार केलेले असतात. नुकतेच साहिदनं दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कृती सेनन (Kriti Sanon), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), कतरिना कैफ (Katrina Kaif), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे काही AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत. या बॉलिवूड अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्यानंतर कशा दिसतील? याचा अंदाज हे फोटो पाहून लावला जाऊ शकतो. 


साहिदनं शेअर केलेल्या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत तसेच त्यांचे केस देखील पांढरे झालेले दिसत आहेत. या फोटोला  साहिदनं कॅप्शन दिलं, 'AI चा वापर करुन बॉलिवूड अभिनेत्रींचे असे फोटो बनवले आहेत ज्यात दिसत आहे की, त्यांच्या वयाप्रमाणेच  सौंदर्याची देखील वाढ होत आहे. मी हे Midjourney AI वापरून बनवले आहे.'


नेटकऱ्यांच्या कमेंट्स 



साहिदनं शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'या अभिनेत्रींनी हे फोटो पाहिले तर  त्यांना हृदयविकाराचा झटका येईल.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'भावा, हे अनरियल वाटत आहे.' काही नेटकऱ्यांनी साहिदनं शेअर केलेल्या फोटोचे कौतुक देखील केले आहे. साहिदनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.






साहिद हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. साहिदला सोशल मीडियावर 23.2K फॉलोवर्स आहेत. 


एआय म्हणजे काय ?


एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआयचा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


  विराट कोहली ते M S धोनी, महिला असत्या तर कशा दिसल्या असत्या? AI चे कमाल फोटो