Samrat Prithviraj Box Office : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला आहे. आतापर्यंत या सिनेमाने फक्त 44.40 कोटींची कमाई केली आहे.
'धाकड'नंतर 'सम्राट पृथ्वीराज' झाला फ्लॉप
बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. पण कंगनाचा 'धाकड' मात्र फ्लॉप ठरला आहे. कंगनाच्या 'धाकड' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. अद्याप चाहत्यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.
'सम्राट पृथ्वीराज'ची कमाई जाणून घ्या...
'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.70 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 12.60 कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 16.10 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे 'सम्राट पृथ्वीराज'ने आतापर्यंत 44.40 कोटींची कमाई केली आहे. विकेंडलादेखील या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळालेली नाही. त्यामुळे कमाईच्या बाबतीत हा सिनेमा मागे पडला आहे.
'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमासाठी अक्षय कुमारने 60 कोटींचे मानधन घेतले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मानुषी छिल्लरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या