Aditya Sarpotdar Bollywood Movie Trailer Released : मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा (Aditya Sarpotdar) एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. हा मराठी सिनेमा नसून त्याचा हिंदी सिनेमा आहे. इतकच नव्हे तर झोंबिवलीनंतर आदित्यचा एक नवा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. या सिनेमाची टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'मुंज्या' असं या सिनेमाचं नाव असून हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. 

दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सनेकडून मुंज्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये सध्या बरेच नवीन प्रयोग होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता एक मराठी दिग्दर्शकही या शर्यातीत उतरला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सध्या आदित्य सरपोतदारच्या मुंज्याची बरीच चर्चा सुरु आहे.  दरम्यान या सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील झळकणार आहेत. सुहास जोशी यांच्यासह महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरही या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे या सिनेमात मराठी दिग्दर्शकासह मराठी कलाकारांची देखील टिम दिसणार आहे.                            

सिनेमा कधी रिलीज होणार?

स्त्री आणि भेडियानंतर मॅडॉक फिल्म्सकडून पुन्हा एकदा नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 7 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा विशेषकरुन कोकणाती मुंज्या या भूतावर असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात बाहुबली चित्रपटातील शर्वरी, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज या कलाकारांचा समावेश आहे. मॅडॉक फिल्म्स प्रोडक्शन, मुंज्याची निर्मिती विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे. 

ही बातमी वाचा : 

Cannes Film Festival : मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानस्पद क्षण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सिनेमाला कान्समध्ये स्टँडिग ओव्हेशन

पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर राग, जॉली एलएलबी सिनेमासोबत तुलना; पोर्शे कार अपघातावर मराठी कलाकारांच्या संतप्त पोस्ट