South Films In 2023 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच आनंददायी होतं. केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2), कांतारा (Kantara) आणि आरआरआर (RRR) सारख्या अनेक पॅन इंडिया सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. एकंदरीतच या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाली. आता दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पुढील वर्षातदेखील कायम राहणार आहे. 


आदिपुरुष (Adipurush) : 


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी 'आदिपुरुष' या सिनेमाचं एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे या सिनेमाला विरोध होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रभासचा हा पॅन इंडिया सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 






हनुमान (Hanuman) : 


दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जाचा 'हनुमान' हा पॅन इंडिया सिनेमा पुढील वर्षात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला असून या टीझरने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 


पुष्पा 2 (Pushpa 2) : 


गेल्या वर्षाच्या अखेरीस 'पुष्पा द राइज' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या भागाच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या म्हणजेच 'पुष्पा 2'च्या (Pushpa 2) शूटिंगला सुरुवात केली आहे. 


सालार (Salaar) : 


केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नीलने आगामी 'सालार' (Salaar) या पॅन इंडिया सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा पुढील वर्षात 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सुपरस्टार प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. 


आरसी 15 (RC 15) :


दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणचा आगामी 'आरसी 15' (RC 15) या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे. शंकर केने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा दाक्षिणात्य सिनेमा 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


संबंधित बातम्या


Christmas Weekend OTT : सिनेरसिकांचा नाताळ होणार मनोरंजक; घरबसल्या 'हे' सिनेमे आणि वेबसीरिज पाहता येणार