मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने आडकाठी केल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही यावर मत व्यक्त केलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रेणुका यांनी मनसेच्या विरोध करण्याच्या आणि तलवार म्यान करण्याच्या पद्धतीवर दृष्टीक्षेप टाकला आहे.

'ज्यांना पटकन एखादी गोष्ट विसरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी एक टाईमलाईन' अशा मथळ्याखाली रेणुका यांनी मनसेची आंदोलनं मांडली आहेत.

रेणुका शहाणेंच्या पोस्टमधून :

3 फेब्रुवारी 2008 : राज ठाकरे कोण आहेत? उत्तर भारतीयांविरोधातील मनसेच्या आंदोलनानंतर जया बच्चन यांचा सवाल

8 सप्टेंबर 2008 : उत्तर प्रदेशचे अॅम्बेसेडर झाल्याने मनसेचा अमिताभ बच्चन यांच्याविरोधात हल्लाबोल. जया बच्चन यांची उपरोधात्मक टिपणी. बिग बींच्या 'द लास्ट लिअर'ला विरोध केल्याने मिसेस बच्चन यांचा माफीनामा

ऑक्टोबर 2016 : बिग बींच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी चितारलेलं चित्र भेट. राज ठाकरेंच्या मुलाला बच्चन यांच्याकडून घड्याळ भेट. याच दरम्यान अमिताभ बच्चन गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर होऊनही मनसेचं कोणतंही आंदोलन नाही

आता करण जोहर

ऑक्टोबर 2009 : वेक अप सिद चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे उल्लेख केल्याने मनसेचं आंदोलन.

करण जोहरचा माफीनामा, मनसेचं आंदोलन मागे.

बॉम्बे टाइम्स या वर्तमानपत्राच्या पुरवणीला मात्र कधीच विरोध नाही

ऑक्टोबर 2016 : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचं पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन. फवाद खानला मनसेचा विरोध.

फ्लॅशबॅक

26/11/2008 : पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला. अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू.

कसाबला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे शहीद.

अनेक पाकिस्तानी कलाकार, गायक, लेखक भारतात काम करुन गेले

2 जानेवारी 2016 : पठाणकोट हल्ल्यात अनेक जवान शहीद

मार्च 2016 : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'कपूर अँड सन्स' प्रदर्शित झाल. हिटही झाला.

मनसेकडून मात्र विरोध नाही.

सध्या :

18 ऑक्टोबर 2016 : करण जोहरचा माफीनामा. पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात न घेण्याचं आश्वासन, मात्र गेल्या वर्षीच सिनेमाचं शूटिंग सुरु केल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याची विनंती

सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय

गृहमंत्र्यांकडून सिनेमा हा व्यवसाय असल्याचं स्पष्टीकरण. पाकिस्तानी व्यक्तींना वर्क व्हिसा देण्याचं आणि भारतात येऊ देण्याचं आश्वासन. केंद्राकडून पाक कलाकारांना बंदी नसल्याचा खुलासा.

केंद्राच्या निर्णयाला मनसेचा विरोध नाही

फ्लॅश फॉरवर्ड :

करण जोहरला राज ठाकरेनं काढलेलं पोर्ट्रेट मिळणार?

'माझ्या मते आपलं लष्कर हे जगातलं सर्वोत्तम आहे. अनेक जवानांनी रक्त सांडून कित्येक युद्धं जिंकली आहेत. जात-धर्म-लिंग न पाहता सर्वसामान्यांच्या मदतीला कोणत्याही परिस्थिती हे जवान धावून येतात. आपण क्रीडा-कला यांना एकवेळ वेगळं ठेवू, पण राजकारणी व्यक्ती राजकारण बाजुला ठेवतील का? ते जे बोलतात, ते वागणं त्यांना जमेलसं वाटत नाही' असं मत रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं आहे.

वाचा रेणुका शहाणे यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट :




संबंधित बातम्या :


मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल


'ऐ दिल..'च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी


मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात


माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका


यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर


मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप


पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…


पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…


‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा


मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप


भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका


माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत


‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा


पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय