Actress Hina Khan Health Updates : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिच्या प्रकृती बाबत मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. आता, स्वत: हिना खानने (Hina Khan Health Updates) आपल्या प्रकृतीबाबत चाहत्यांना अपडेट दिली आहे. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाला असून उपचार सुरू असल्याची माहिती तिने दिली आहे. हिना खानने 'कसौटी जिंदगी की -2' या मालिकेत कोमलिका ही खलनायकी भूमिका साकारली होती.
हिना खानने काय सांगितले?
अभिनेत्री हिना खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत काही चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सत्य माहिती मीच सांगण्याचा निर्णय घेतला आहे. मला ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली असून तिसऱ्या स्टेजवर आहे, असे हिनाने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले.
हिना खानने म्हटले की, मी हिनोहोलिक्स आणि ज्यांना माझी काळजी वाटतेय अशा सर्वांसोबत महत्त्वाची माहिती शेअर करू इच्छिते. मला तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यानंतरही मी ठीक असल्याचे सांगू इच्छिते. मी स्ट्राँग आहे, कणखर असून या आजाराला मात देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्यामुळे मी आणखी मजबूत होण्यासाठी, आजाराला मात देण्यासाठी सगळे प्रयत्न करणार असल्याचे हिना खानने सांगितले.
मूळची जम्मू-काश्मीरमधील असलेली हिना खान हीने सोनी टीव्हीवरील 'इंडियन आयडॉल' या गाण्याच्या रिएल्टी शोमध्ये 2008 मध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी ती 'टॉप 30 ' स्पर्धकांमध्ये होती. अभिनेत्री हिना खानने स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अक्षरा आणि 'कसौटी जिंदगी की 2' मधील कोमोलिका ही व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकांमुळे ती लोकप्रिय झाली. त्यानंतर 2017 मध्ये हिना खानने 'फिअर फॅक्टर:खतरो के खिलाडी 8' आणि 'बिग बॉस 11' या रिएल्टी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय तिने काही मालिकांमध्ये कमी कालावधीसाठी छोट्या भूमिका साकारल्या. हिना खानने नागीन सारख्या सुपरनॅच्युअरल शोमध्ये काम केले होते.