Ayesha Takia Trolled : सलमान खानसोबत वॉन्टेड चित्रपटात झळकणारी ग्लॅमरस अभिनेत्री आयेशा टाकिया (Ayesha Takia) पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. मोठ्या पडद्यापासून आयशा दूर असली तरी तिला चाहते वॉन्टेड गर्ल म्हणून ओळखतात. आयेशाने या चित्रपटानंतर सिनेसृष्टीत कमबॅक केले नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. आयशा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिच्या नवीन लूकमध्ये एक फोटो शेअर केला आहे ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आयशाचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोक तिला ट्रोल करत आहेत.


आयशाने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती ब्लू आणि गोल्डन कलरच्या साडीत दिसत आहे. यासोबत तिने पिंक टोन्ड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. या फोटोमध्ये चाहत्यांना ती आयशा आहे हे ओळखता येत नाही.


ट्रोल झाली आयशा टाकिया...


लोक आयशाला तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स टाकून ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले - तुम्ही तुमचा चेहरा आणि नैसर्गिक सौंदर्य का खराब करत आहात? तर दुसऱ्याने लिहिले - तू अशी का झालीस, तू सुंदर होतीस. एकाने लिहिले- तिला वाटते की ती काइली जेनर आहे. एका यूजरने लिहिले - पण तू एकेकाळी बॉलिवूडची राणी होतीस.


 






आयशा टाकियाने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवले होते. मॉडेलिंगमुळे तिला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या अल्बम गाणे ‘मेरी चुनर उडी जाये’मधून ब्रेक मिळाला होता. आयशाने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात 'टारझन', 'दिल मांगे मोर', 'सोच ना था', 'शादी नंबर 1', 'दोर' आणि 'पाठशाला' यांचा समावेश आहे. आयशाने 'टारझन' चित्रपटातून पदार्पण केले. चाहते नेहमीच तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे कौतुक करताना दिसतात. चित्रपटांमध्ये काम करत असताना आयशा अचानक स्पॉट लाईफमधून गायब झाली. वृत्तांवर विश्वास ठेवला तर आयशाने लग्नानंतर चित्रपटांपासून दुरावले होते. 2011 मध्ये आलेल्या 'मोड' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.


‘वॉन्टेड’ चित्रपटाच्या यशानंतर आयेशा टाकियाने लग्न केले. लग्नानंतरच तिचा 'वॉन्टेड' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आयशाने टॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'सुपर' या टॉलिवूड चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यश मिळवल्यानंतर आयशा टाकियाने करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी 2009मध्ये समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केले. लग्नानंतर ती ‘पाठशाला’ आणि ‘मोड’ या चित्रपटात दिसली होती.