Actor Naveen Polishetty Confirms :  तेलगू सिनेसृष्टीचा स्टार अभिनेता नवीन पोलिशेट्टी (Naveen Polishetty) याचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्याला अनेक ठिकाणी दुखापत झाली असून काही ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. अभिनेता नवीन पोलिशेट्टी याने स्वत: या अपघाताबाबत चाहत्यांना बुधवारी, 17 जुलै रोजी माहिती दिली. आपल्या प्रकृतीची माहिती आपण स्वत: देणार असून इतर कोणत्याही वृत्तांवर विश्वास ठेवू नये असेही नवीनने स्पष्ट केले. नवीन आपल्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


नवीन पॉलिशेट्टी शेवटचा अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) स्टारर 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' मध्ये झळकला होता. यापूर्वी त्याने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत 'छिछोरे' चित्रपटात काम केले होते. 



Actor Naveen Polishetty :  दाक्षिणात्य अभिनेत्याचा भीषण अपघात, हात-पायांना गंभीर दुखापत, आता प्रकृती कशी?


नवीन पोलिशेट्टीला मल्टिपल फ्रॅक्चर...


34 वर्षीय नवीन पोलिशेट्टीने एक्सवर ट्वीटर अकाउंटवर म्हटले की, दुर्दैवाने, माझ्या हाताला गंभीर मल्टिपल फ्रॅक्चर झाले आहे आणि माझ्या पायालाही दुखापत झाली आहे. माझ्यासाठी खूप कठीण आणि वेदनादायी काळ होता. पूर्ण बरे होण्यासाठी आणि तुमच्यासाठी पूर्ण उर्जेने कामगिरी करण्यासाठी मी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम करत आहे. तुमचं प्रेम, सहकार्य आणि संयम हेच माझ्यासाठी सध्या मोठं  औषध आहे. 






ठीक होण्यासाठी लागणार काही दिवसांचा अवधी






अपघात कधी, कुठे आणि कसा झाला, याबाबत नवीनने काहीही माहिती दिली नाही. पूर्णपणे बरं होण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्याने सांगितले. चाहत्यांनी आणि लोकांनी फेक न्यूजपासून सावध रहावे, प्रकृतीबाबत मी स्वत: माहिती देणार असल्याचे नवीनने म्हटले. 


इतर महत्त्वाची बातमी :