Bobby Deol as Aurangzeb : संपूर्ण देशात सध्या छावा (Chhaava) या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका केली आहे. तर बादशाहा औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना (Akshaye Khanna) या कसलेल्या अभिनेत्याने केली आहे. अक्षय खन्नाने केलेल्या या अभिनयाची सध्या सगळीकडेच वाहवा होत आहे. असे असतानाच आता आणखी एक अभिनेता औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

चित्रपटाचे टिझर आले समोर

लवकरच हरी हर वीरमल्लू नावाचा एक दाक्षिणात्य चित्रपट येतोय. या चित्रपटाचीही सध्या देशभरात तेवढीच चर्चा आहे. या चित्रपट सुप्रसिद्ध पवण कल्याण हा वीरमल्लू यांच्या भू्मिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे एक टिझरही समोर आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सिनेरसिकांना मोठ्या प्रमाणात अॅक्शन पाहायला मिळणार आहे. असे असतानाच या चित्रपटातील औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.

औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार?

बॉलिवुडमध्ये गॉड या नावाने प्रसिद्ध असलेला बॉबी देओल हा या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे बॉबी देओलचा या चित्रपटातील लूकदेखील समोर आला आहे. हरी हर विरमल्लू या चित्रपटाच्या टिझरमध्ये बॉबी देओल एखाद्या राजाच्या गणवेशात दिसतोय. अक्षय खन्नानंतर आता बॉबी देओल औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसतोय. 

चित्रपटात नेमके काय असेल?

दरम्यान, छावा चित्रपटासाठी अक्षय खन्ना या अभिनेत्याला 2 कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलला मात्र बादशाहा औरंगजेब साकारण्यासाठी तीन कोटी रुपये फी म्हणून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. लवकरच हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय असेल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

हेही वाचा :

poonam pandey Viral Video : सेल्फीचा बहाण्याने जवळ आला, चाहत्याकडून किस करण्याचा प्रयत्न; पूनम पांडेने पळ काढला Video

Narendra Modi on Chhava : छावाची धूम दिल्लीत पोहोचली, नरेंद्र मोदींकडून संभाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य, शिवाजी सावंतांचा खास उल्लेख

Chhaava : छावा सिनेमा टॅक्स फ्री केल्यास तिकीट किती स्वस्त होतं? अनेक राज्यांची घोषणा; पण खिशावर किती परिणाम?