Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये अभिषेकनं डॉ. अविनाश सभरवाल ही भूमिका साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चननं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीबाबत त्याचं मत व्यक्त केलं. 


काय म्हणाला अभिषेक बच्चन? 
'जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले, तेव्हा लोक एक बटण दाबल्यानंतर काहीही पाहू शकत होते. ओटीटीवर तुम्ही प्रत्येक भाषेत शो पाहू शकता. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला तरी चांगला कंटेंट नेहमी लोकांना आवडेल. डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे कलेक्शन ऐवजी कंटेंटकडे लक्ष देतात. काही लोक कंटेंटपेक्षा कलेक्शन आणि पैशांबाबत जास्त विचार करतो.' असं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अभिषेकनं सांगितलं. 


अभिषेकची आगामी वेब सीरिज


अभिषेकनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' या आगामी वेब सीरिजबाबत देखील सांगितलं, 'या सीरिजला एग्जिक्युट करणं खूप अवघड होते कारण ही थ्रिलर वेब सीरिज आहे. वेब सीरिजमधील माझ्या भूमिकेनं मला या सीरिजकडे आकर्षित केलं. मला मयंकचं लिखाण आवडलं. ही एक चांगली थ्रिलर सीरिज आहे. '






ब्रीद: इनटू द शॅडो -2 ही सीरिज 9 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेकसोबतच नवीन कस्तूरिया आणि सैयामी खेर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष