Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा अडचणीत सापडला आहे. आता त्याने 'पठाण' (Pathaan) सिनेमातील शाहरुखच्या (Shahrukh Khan) हेअरस्टाईलवर मोठं वक्तव्य केलं आहे.
साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाला,"मला असं वाटतं शाहरुख खान 'बिग बॉस' बघत होता. सलमान (Salman Khan) आणि मी एका इंडस्ट्रीमध्ये आहोत. इंडस्ट्री आणि राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. शाहरुखचा 'पठाण' सिनेमातील लूक माझ्यासारखा आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे".
अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला,"मी लहान असताना 1991 साली संजू बाबा म्हणजे संजय दत्तचे लांब केस होते. पण आता 2022 वर्षात जी स्टाइल आणली गेली आहे ती माझी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, शाहरुख खान बिग बॉस बघत होता. भाईजानचं बिग बॉस त्याने पाहिलेलं असावं. म्हणून शाहरुखने 'पठाण' सिनेमात केलेली स्टाईल माझीच आहे".
बिचुकलेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता बादशाह यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बिचुकलेचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे 'पठाण' सिनेमाला विरोध होत असताना बिचुकलेच्या वक्तव्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
'पठाण' वादाच्या भोवऱ्यात
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीच्या रंगामुळे या सिनेमावर टीका केली जात आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान चार वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखची चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या