मुंबई :  मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या बहुप्रतिक्षीत दंगल या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. आमीर खाननेही हे पोस्टर ट्विट केलं आहे.


 

म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. या पोस्टरवर वयस्कर आमीर खान त्याच्या चार मुलींसोबत दिसतो.

 

'दंगल'मधील आमीरचा मस्क्युलर लूक


 

दंगल या सिनेमात आमीर खानने पैलवान आणि ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी आमीरने सुरुवातीला त्याचं वजन सुमारे 90 किलोपर्यंत वाढवलं होतं.




नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ सिनेमा 23 डिसेंबर 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातमी

अमिरच्या 'दंगल' सिनेमात एकही गाणं नाही?

आमीरच्या नव्या सिनेमाची जुळवाजुळव, भूमिका ठरली