3 idiots sequel: तब्बल 15 वर्षांनंतर 3 इडीयट्स या सिनेमाचा सिक्वेल बनणार असल्याची मोठी खुशखबर समोर आली आहे. अमीर खान करीना कपूर आर माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकदा एकत्र दिसणारा सून राजकुमार हिराणी दिग्दर्शित ही फिल्म 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अर्थात पहिल्या भागाचा  नॉस्टॅल्जिया आणि नवी कथा या दोन्हींचा मिलाफ या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

Continues below advertisement

ऑल इज वेल! पुन्हा ऐकू येणार

पंधरा वर्षांपूर्वी प्रेक्षकांना ऑल इज वेल म्हणायला लावणारे आयकॉनिक फिल्म थ्री इडियट्स आजही चाहत्यांच्या मनात आहे. या फिल्मचा सिक्वेल बनणार असल्याने फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या कथेला पुन्हा पुढे नेण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला असून थ्री इडीयट्स चा सिक्युल येणार असल्याच्या अपडेटने सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

Continues below advertisement

रँचो - राजू - फरहानचा ट्रायो परतणार

थ्री इडीयट्सच्या दुसऱ्या भागातही मूळ स्टारकास्ट परतणार  आहे . आमिर खान, करीना कपूर, आर माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शन पुन्हा राजकुमार हिराणी करत असून निर्मिती विधु-विनोद चोप्रा राजकुमार हिराणी आणि आमिर खान यांची असणार आहे. पिंक वेलाने दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांनंतर हा बहुप्रतीक्षित सिक्वेल आकार घेत आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट लॉक झाली असून टिमही उत्साहात असल्याचं सांगितलं जातंय.

आमिर-करीना जोडी पुन्हा चमकेल?

आमिर आणि करीना ही ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. ‘3 इडियट्स’मध्ये या जोडीनं जबरदस्त धमाल केली होती. मात्र त्यांच्या शेवटच्या एकत्र चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ला तितकी पसंती मिळाली नव्हती. त्यामुळे या सिक्वेलमध्ये ‘पिया-रँचो’ पुन्हा तीच जादू दाखवतील का? याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.

2009 मध्ये रिलीज झालेली ‘3 इडियट्स’ ही भारतीय सिनेमातील कल्ट क्लासिक ठरली होती. शिक्षण पद्धतीवर तीव्र चर्चा घडवून आणणारी आणि 200 कोटींचा आकडा गाठणारी ही पहिली भारतीय फिल्म होती. आता 15 वर्षांनंतर टीम पुन्हा एकत्र येत असल्याने आणि कथेत नवा ताजेपणा जोडला गेल्याने ‘3 इडियट्स 2’ हे दशकातील सर्वात मच-अवेटेड चित्रपटांपैकी एक ठरलं आहे.

दादासाहेब फाळके बायोपिक होल्डवर

असंही कळतंय की आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकला सध्या थोडासा ब्रेक दिलं आहे. कारण स्क्रिप्ट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तयार झाली नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांनी सध्या ‘3 इडियट्स 2’लाच प्राधान्य दिलं आहे.