Bollywood Vinod Khanna Rishi Kapoor actress moushumi chatterjee : अभिनेते ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्यासोबत काम करणारी अभिनेत्री नेहमीच साडी सूट सलवार घालायची. तिने चित्रपटांमध्ये कधीही डीप नेक ब्लाउज घातले नव्हते. पण एका दृश्यात तिला असे काही घालावे लागले की ती ढसाढसा रडू लागली. ही कोणी दुसरी नसून प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आहे, जिने लग्नानंतरही अनेक चित्रपटांत प्रमुख भूमिका केल्या आणि आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. निरागस चेहरा लाभलेल्या मौसमी यांनी आपल्या काळात राजेश खन्ना, जितेंद्र, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि विनोद मेहरा यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं.

मौसमी चॅटर्जींनी प्रसिद्धी आणि संपत्तीही कमावली, पण त्या नेहमी म्हणायच्या की, "चित्रपटासाठी मी कधीच माझी मर्यादा ओलांडणार नाही." त्यांचा एक ठाम नियम होता – त्या कधीही छोटे कपडे घालणार नाहीत. त्या बहुतांश वेळा साडी किंवा सलवार-सूट मध्येच दिसायच्या.

फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत मौसमी यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की, एकदा एका दिग्दर्शकाच्या आग्रहामुळे त्यांना घाघरा आणि डीप नेक ब्लाउज घालावा लागला. त्यांना तो अनुभव अत्यंत त्रासदायक वाटला. त्या म्हणाल्या, "मला असं वाटलं जसं मी नग्न झाले आहे."

मौसमी म्हणाल्या की, त्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत आल्या आणि त्या वेळेसच त्यांनी ठरवलं की, "मी साडीच घालणार आणि यात कोणताही तडजोड होणार नाही."

पण 1973 मध्ये राज खोसला दिग्दर्शित 'कच्चे धागे' या चित्रपटात असं काही घडलं की, त्या अत्यंत लाजून गेल्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत विनोद खन्ना आणि कबीर बेदी होते.

त्यावेळी मनी जे राबडी यांनी त्यांना बॅकलेस ब्लाउज आणि शॉर्ट घाघरा घालायला दिलं. हे कपडे पाहून त्या इतक्या अस्वस्थ झाल्या की त्या थेट रडायला लागल्या.

मौसमी म्हणाल्या, "मला वाटलं की मी उघडीच आहे. मी रडू लागले. मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाले, ‘कृपया मला कोलकाताला परत पाठव. मी आता इथे काम करू शकत नाही. हे लोक माझे सगळे कपडे उतरवायला निघाले आहेत.’ त्यानंतर माझा नवरा धावत आला आणि त्यांनी मला समजावलं की, ‘या कपड्यांत काही वावगं नाही, ते पात्राच्या गरजेनुसार आहेत.’"

मौसमी चॅटर्जींनी हेही उघड केलं होतं की, केवळ कपड्यांमुळेच त्यांनी ऋषिकेश मुखर्जी यांची ‘गुड्डी’ ही फिल्म नाकारली होती, कारण त्या चित्रपटात त्यांना स्कर्ट घालायचा होता. आणि हाच चित्रपट जया बच्चन यांना सुपरस्टार बनवणारा ठरला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

शोले सिनेमाने बॉलिवूडचा सर्वात मोठा व्हिलन बनवलं, पण पुढे वजन वाढल्यामुळे अमजद खानचं करिअर उध्वस्त झालं