Bollywood : बॉलीवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्री डिंपल कपाडियांची अभिनयक्षमता आजही बेजोड मानली जाते. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटानंतर अभिनेता ऋषी कपूरसोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या खूपच गाजल्या होत्या. सनी देओलसोबतच्या प्रेमसंबंधांमुळेही त्या अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत.
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी 1973 साली डिंपल कपाडियाने विवाह केला होता. या विवाहातून त्यांना दोन मुली झाल्या. डिंपलचा पहिला रोमँटिक ड्रामा 'बॉबी' प्रदर्शित होण्यापूर्वीच काकांनी (राजेश खन्ना) तिचा हात पकडला होता. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही.
डिंपल कपाडियाने एक यशस्वी पदार्पण, सुपरस्टार नवरा आणि हॉलिवूडमधील मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करत चित्रपटसृष्टीत मोठं स्थान मिळवलं. तिने हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्यासोबतही काम केलं आहे.
ज्या काळात अभिनेत्री साधेपणात वावरायच्या, त्या काळात डिंपलने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सगळ्यांचं मन जिंकलं होतं. 90 च्या दशकात अनेक तरुणांची ती लाडकी बनली होती. खूप कमी वयात तिने लग्न केलं, याचं तिला नंतर पश्चात्तापही झाला. तरीसुद्धा, आजही ती आपल्या कामामुळे ओळखली जाते.
बॉलीवूडमध्ये डिंपल कपाडियाला 'लेडी सुपरस्टार' असंही संबोधलं जातं. 1973 साली प्रदर्शित झालेल्या 'बॉबी' या चित्रपटात तिच्या दमदार भूमिकेने आणि बोल्ड लूकमुळे रुपेरी पडद्यावर खळबळ माजली होती.
डिंपलने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं आहे — ज्यात जॅकी श्रॉफ, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती आणि विनोद खन्ना यांचा समावेश आहे. डिंपल कपाडिया आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून, काही चित्रपटांमध्ये त्यांची जोडी विशेष गाजली. त्यामधील एक चित्रपट विशेषतः चर्चेत राहिला.
1985 साली आलेल्या डिंपलच्या 'सागर' या चित्रपटाला हिंदी सिनेमातील सर्वात बोल्ड आणि चर्चित चित्रपटांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटात दमदार अभिनय आणि रोमँटिक कथानक यामुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं, पण काही दृश्यांमुळे चित्रपटाला खूप टीकेचा सामना करावा लागला.
ऋषी कपूरसोबतच्या अफेअरच्या चर्चा जशा सामान्य झाल्या होत्या, तसंच ‘सागर’ (1985) मध्ये डिंपलने ऋषीसोबत अनेक इंटिमेट सीन केले होते, जे खूप चर्चेत आले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या