Tarzan Actor Hemant Birje: कधीकाळी 'बॉलिवूडचा टार्झन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हेमंत बिर्जे (Hemant Birje) सध्या चर्चेत आहे. एकेकाळी गोविंदा, सलमान सारख्या दिग्गजांना आपल्या शरीरयष्टीनं जळवणाऱ्या या अभिनेत्यानं एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी पैसे तर घेतले, पण त्या वेळत तो तिथे पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतल्यावर तो जवळच्याच एका हॉटेलात मद्यधुंद अवस्थेत लोळताना आढळला. त्यानं मोठा धिंगाणा घातला, त्याचं आयोजकांशी भांडणंही झालं. परिस्थिती इतकी बिकट झाली की, पोलिसांना बोलवावं लागलं. पण तरीसुद्धा नशेत धुंद असलेल्या अभिनेत्याची अरेरावी थांबेना. अखेर पोलिसांनी नाईलाजानं कारवाई करत, अभिनेत्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं.
कधीकाळी सलमान, संजय दत्तला टक्कर देणाऱ्या अभिनेत्यानं एका कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी मोठ्ठं मानधन घेतलेलं. पण, तो कार्यक्रमासाठी पोहोचलाच नाही. त्याऐवजी तो हॉटेलात दारू पिऊन लोळत पडलेला. त्याचं आयोजकांशी जोरदार भांडणंही झालं. अभिनेता हेमंत बिर्जेनं मोठा धिंगाणा घातला. पण, परिस्थिती एवढी बिकट झाली की, पोलिसांपर्यंत प्रकरण पोहोचलं. पोलिसांनी अभिनेत्याला आणि त्याच्यासोबतच्या तिघांना थेट पोलीस स्टेशन दाखवलं.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता हेमंत बिर्जे उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे महर्षी वाल्मिकी महोत्सव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पोहोचला होता. त्या बदल्यात त्यानं आयोजकांकडे तब्बल 90 हजार रुपये मागितले. आयोजकांनी त्याला पैसे दिलेसुद्धा. कार्यक्रमासाठी ठरल्याप्रमाणे अभिनेता अलिगढला गेला. पण, तो कार्यक्रमासाठी पोहोचलाच नाही. तेव्हा आयोजक त्याला शोधण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले, त्यावेळी अभिनेता मद्यधुंद अवस्थेत आढळला. आयोजकांनी त्याच्यावर दारू पिऊन असभ्य वर्तन केल्याचा आरोपही केला. जेव्हा आयोजकांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा मोठा वाद निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत बिर्जेला कार्यक्रमाला जाण्यासाठी 11 ऑक्टोबरला मुंबईहून दिल्लीला जाणारी फ्लाईट पकडायची होती. पण, उशिरा पोहोचल्यामुळे त्याची फ्लाईट चुकली. त्यानंतर त्यानं 25 हजार रुपये देऊन दुसरी फ्लाईट बुक केली. त्या फ्लाईटनं अभिनेता 12 ऑक्टोबरला दिल्लीला पोहोचला. तिथून तो दिल्लीहून अलीगढला तीन मित्रांसोबत आला. तिथल्या एका हॉटेलमध्ये तो राहिला, आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो एका कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होता.
पैसे घेऊनही अभिनेता कार्यक्रमाला आलाच नाही; आयोजकांचा आरोप
आयोजकांचा आरोप आहे की, वारंवार बोलावूनही अभिनेता हेमंत बिर्जे कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. जेव्हा त्याला शोधण्यासाठी आयोजक हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा वाद झाला. जेव्हा त्याला आगाऊ रक्कम आणि तिकिटाचे पैसे परत करायला सांगितले, तेव्हा अभिनेत्यानं स्पष्टपणे नकार दिला. गोंधळ वाढत असताना पोलीस आले. त्यानंतर हेमंतनं 50,000 रुपये परत करायला तयार झाला. बराच वाद झाला, त्यानंतर अभिनेत्यासह त्याच्या तीन साथीदारांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर आयोजकही आले. कोणताही करार न झाल्यानं आयोजकांनी कलाकारांविरुद्ध तक्रार दाखल केली.
कधीकाळचा बॉलिवूडचा सुपरस्टार
'बॉलिवूडचा टार्झन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हेमंत बिर्जेनं अनेक बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केलंय. 'अॅडव्हेंचर्स ऑफ टार्जन' सिनेमातील टार्झनची भूमिका साकारणारा हेमंत बिर्जेनं हिंदी, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :