Bollywood Superhit Horror Movie: वर्ष 2002चं बॉलिवूडमध्ये (Bollywood Movie) अनेक सिनेमे प्रदर्शित होण्यासाठी रांग लावून उभे होते. अ‍ॅक्शनपासून अगदी रोमान्सपर्यंत... अनेक सिनेमे बॉक्स ऑफिस (Box Office) गाजवण्यासाठी सज्ज होते. पण, या सर्व गर्दीत एक सिनेमेा प्रदर्शित झाला, ज्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच, पण त्यांना थरथर कापायलाही भाग पाडलं. एवढंच काय तर, या सिनेमातील काही दृश्यांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकाही चुकवला. हा चित्रपट होता 'राज' (Raaz), जो आजपासून 23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला. 

विक्रम भट्ट (Vikram Bhatt) दिग्दर्शित, 'राज' (Raaz Movie) सिनेमा 2 तास 32 मिनिटांचा होता आणि त्यात बिपाशा बासू (Bipasha Basu), दिनो मोरिया, मालिनी शर्मा, आशुतोष राणा आणि विश्वजीत प्रधान यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकलेले. चित्रपटाची कथा संजना (बिपाशा) आणि आदित्य (दिनो) यांच्या अवतीभोवती फिरत होती. सिनेमातली अभिनेत्री आणि अभिनेता त्यांचं लग्न वाचवण्यासाठी सुट्टीवर उटीला येतात आणि तिथे संजनाचा आदित्यच्या भूतकाळाशी सामना होतो. चित्रपटातील दृश्य इतकी भयानक होती की, ती पाहिल्यानंतर कोणाच्याही पायाखालची जमिन हादरली असती.

खऱ्याखुऱ्या हॉन्टेड ठिकाणी झालेलं 'राज'चं शुटिंग

'राज' सिनेमाबाबतची एक गोष्ट तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, या चित्रपटानं थिएटरमध्ये प्रेक्षकांना घाबरवलंच, पण शुटिंगवेळी सिनेमानं स्टारकास्टलाही घाबरवलं होतं. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर अशा घटना घडल्या की स्टारकास्ट घाबरली होती. 'राज' सिनेमाचं शुटिंग उटीमधील फर्नहिल हॉटेल, पाईन फॉरेस्ट आणि लॉरेन्स स्कूलमध्ये झालेलं. एकदा बिपाशा बासूनं एका मुलाखतीत 'राज'च्या सेटवर खऱ्या आयुष्यात घडलेल्या भयानक गोष्टींबद्दल सांगितलं होतं.

'त्या' रात्री आलेला हॉटेलमध्ये फर्निचर सरकवण्याचा आवाज पण,... 

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, बिपाशा बासूनं सांगितलेलं की, एकदा टीमं फर्निचर सरकवण्याचा आवाज ऐकला, आवाज वाढला, त्यामुळे काहीजण रिसेप्शनवर तक्रार करायला गेले, पण त्यावेळी त्यांना जे कळालं ते हादरवणारं होतं. बिपाशा बासू म्हणालेली की, एकदा सरोज जी आणि त्यांच्या टीमनं रात्री उशिरा चेक इन केलं होतं. त्यांना झोप येत नव्हती, कारण त्यांना वरच्या मजल्यावरुन सारखा फर्निचर सरकण्याचा आवाज येत होता. आवाज फारच कर्कश होता. सकाळी लवकर शूटिंग करणाऱ्या डान्सर्सनी रिसेप्शनवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. काही जण झोपायला न मिळाल्यामुळे वैतागले होते, त्यावेळी ते तक्रार करण्यासाठी खाली गेले, पण रिसेप्शनिस्टनं त्यांना वेड्यात काढलं. कारण, ते जिथे राहत होते, तिथे वरती कोणताही मजला नव्हता."

बिपाशाही भेदरलेली 

बिपाशानं मुलाखतीत बोलताना सेटवरचा आणखी एक भयानक किस्सा रिविल केला होता. बिपाशान सांगितेलं की, ती एका लोकेशनवर सीन शूट करत होती, जिथे सतत तिला रिटेक करावं लागत होतं. बिपाशानं सांगितलेलं की, मी एका खोलीत प्रवेश केल्यानंतर मला फक्त तीन शब्द बोलायचे होते, पण मी अचानक गप्प बसायचे. काही रिटेकनंतर विक्रमनं मला घरी पाठवलं. नंतर आम्हाला कळलं की, तिथे एका मुलीनं आत्महत्या केलेली. मग तिथे एक पूजा घातली, नंतर आम्ही सीन दुसऱ्या ठिकाणी शूट केला.

गाण्याच्या मध्येच ऐकू आलेला मुलीचा आवाज 

बिपाशा बासू म्हणाल्या की, एकदा डॉ. आंबेडकरांचा फोटो पडला होता. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झालेला. एवढंच नाहीतर, एका रात्री वाशीच्या एका ऑफिसमध्ये शूटिंग सुरू असताना, तिला आणि तिच्या असिस्टंटला गाण्यात एका मुलीचा आवाज ऐकू आलेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Madhuri Dixit Intimate Scene: माधुरीसोबत इंटीमेट सीन, देहभान विसरला सुपरस्टार; दिग्दर्शक थांब-थांब म्हणाले, पण, त्यानं जबरदस्तीनं किस करताना ओठ चावले