Bollywood : चालू वर्षात बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांनी आपली छाप पाडली, पण यामध्ये एक असा सिनेमा होता ज्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. इतकंच नाही तर निर्मात्यांना देखील या सिनेमांना मालामाल केलंय. आत्तापर्यंत या सिनेमाने निर्मात्यांना कोट्यावधी रुपयांची कमाई करुन दिली आहे.  या क्राइम-थ्रिलर सिनेमावर निर्मात्यांनी तब्बल 120 कोटी रुपये खर्च केले आणि रिलीज होताच थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी उसळली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई देखील केली आहे. आपण बोलत आहोत अजय देवगनच्या "रेड 2" विषयी.

Continues below advertisement

हा सिनेमा प्रेक्षकांना केवळ कथेमुळेच आकर्षित करून गेला नाही, तर त्याने आपल्या उत्कंठावर्धक पटकथेमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. "रेड 2" चे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. ही 2018 मध्ये आलेल्या 'रेड' या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये अजय देवगनने प्रामाणिक इनकम टॅक्स ऑफिसर अमय पटनायकची भूमिका साकारली होती.

या वेळी सिक्वेलमध्ये अजय देवगनसोबत रितेश देशमुख, वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला, गोविंद नामदेव आणि सुप्रिया पाठक यांसारख्या मोठ्या कलाकारांनी भूमिका बजावल्या आहेत.

Continues below advertisement

चित्रपटाची कथा सात वर्षांनंतरची आहे, जेव्हा अमय पटनायकचा ट्रान्सफर राजस्थानमध्ये होतो. तिथे तो एका भ्रष्ट नेत्यावर, दादाभाई (रितेश देशमुख) यांच्यावर कारवाई करायला सुरुवात करतो. अमयच्या प्रामाणिकपणामुळे आणि धाडसामुळे दादाभाई अस्वस्थ होतो, आणि इथूनच मूव्हीमध्ये खरा थरार सुरु होतो. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एक जबरदस्त ट्विस्ट उघडकीस येतो.

चित्रपटात अजय देवगनने आपली भूमिका दमदारपणे साकारली आहे, परंतु रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय करत अजयला जबरदस्त टक्कर दिली आहे. प्रेक्षकांना रितेशचा व्हिलन रोल खूपच भावला.

बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, "रेड 2" ने भारतात 176.93 कोटी रुपये कमावले असून, जागतिक स्तरावर या सिनेमाने एकूण 241.68 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून स्पष्ट होते की, "रेड 2" ने आपल्या खर्चाच्या दुपटीहून अधिक कमाई केली आहे.

"रेड 2" ला IMDb वर 7.1 रेटिंग मिळाली आहे आणि आता हा सिनेमा नेटफ्लिक्सवर ओटीटीवर देखील उपलब्ध आहे. सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली आहेत, पण "नशा" हे गाणं विशेष चर्चेत राहिलं ज्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाने नृत्य सादर केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐश्वर्या रायसोबत सुशांत सिंह राजपूतचा डान्स व्हिडीओ, बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केलं होतं काम VIDEO