Singer Zubeen Garg Death News: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक (Bollywood Singer) जुबिन गर्ग (Zubeen Garg) यांच्या अकाली एग्झिटनं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. 52 वर्षाच्या जुबिन गर्गचा सिंगापूरमध्ये (Singapore) स्कूबा डायव्हिंग (Scuba Diving) करताना अपघाती मृत्यू (Accidental Death) झाला. जुबिन सिंगापूरमधल्या नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये (Northeast Festival) परफॉर्म करणार होता. पण, परफॉर्मन्सला अवकाश असल्यामुळे जुबिननं थ्रील अनुभवण्यासाठी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच त्याचा अंत झाला. जुबिनच्या जाण्यानं केवळ फिल्म इंडस्ट्रीच नाहीतर अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गायक जुबिन गर्गनं ज्यावेळी स्कूबा डायव्हिंगसाठी समुद्रात उडी घेतली. त्यावेळी त्यानं लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं. मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलिसांनी त्याला समुद्रातून वाचवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झालेला, जुबिनला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अशातच आता जुबिनचा मृत्यूपूर्वीचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे.
मृत्यूपूर्वीच्या व्हिडीओमध्ये काय म्हणालाय जुबिन?
जुबिन गर्गच्या शेवटच्या व्हिडीओनं त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांशी त्याच्या आयुष्यातील अखेरचा संवाद साधत आहे. आपल्या लाडक्या गायकाचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहते भावूक झाले आहेत. त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून इमोशनल मेसेज करत कमेंट केल्या जात आहेत. तसेच, कमेंटमध्ये जुबिनला श्रद्धांजली वाहिली जात आहे. जुबिननं इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
जुबिनचा हा व्हिडीओ त्याच्या मृत्यूच्या काही तास आधीचा आहे. जुबिननं स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये 'चौथ्या ईस्ट इंडिया महोत्सवा'साठी जुबिननं त्याच्या चाहत्यांना आमंत्रण दिलं होतं. हा महोत्सव 20 आणि 21 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये होणार होता. या कॉन्सर्टमध्ये जुबिन त्याची लोकप्रिय हिंदी, बंगाली आणि आसामी गाणी सादर करणार होता. जुबिनच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण होता. पण त्याआधीच त्याच्यावर काळानं घाला घातला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुबिन नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेला होता, जिथे तो एक संगीत मैफिल सादर करणार होता. त्याच्या अचानक निधनानं चाहते दुःखी झाले आहेत. 'या अली' आणि 'दिल तू ही बता' सारखी गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. त्यानं 'बोझे ना से बोझे ना', 'परन जाये जलिया रे' आणि 'खोका 420' सारख्या हिट बंगाली चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहेत.
40,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड करणारा भारतीय सिंगर...
जुबीन गर्गचं खरं नाव जीवन बर्थकूर होतं. त्याचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी जोरहाटमध्ये झाला. 2006 मध्ये 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' गाण्यानं त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक हिट गाणी दिली. मीडिया रिपोर्टनुसार, त्यानं आसामी, बंगाली, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये 40,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. जुबीन गर्ग एक उत्तम गायक होता. त्यानं ईशान्य आणि आसामच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी हिंदी, आसामी आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. पंतप्रधानांसह जवळजवळ सर्व प्रमुख नेत्यांनी जुबिन गर्गला श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :