Bollywood Singer Sachin Sanghvi Arrested: लग्नाचं आमिष दाखवून गैरफायदा घेतला, बळजबरीनं गर्भापात...; 19 वर्षीय तरुणीचे गंभीर आरोप, बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला अटक
Bollywood Singer Sachin Sanghvi Arrested: अल्बममध्ये काम देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप 19 वर्षांच्या तरुणीनं गायक सचिन संघवीवर केला आहे.

Bollywood Singer Sachin Sanghvi Arrested: बॉलिवूडच्या (Bollywood News) प्रसिद्ध सिंगरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल (Rape Case) करण्यात आला आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर (Singer Sachin–Jigar) यांच्यातील सचिन संघवी (Sachin Sanghvi) (45) ला अटक करण्यात आली आहे. अल्बममध्ये काम देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात वर्ग केला. दरम्यान, याप्रकरणी सिंगर सचिन संघवीला अटक करण्यात आलेली. मात्र, त्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 19 वर्षांच्या तरुणीनं तक्रारीत म्हटलंय की, "फेब्रुवारी, 2024 मध्ये सचिन संघवी यांनी तिला इंस्टाग्रामवर एक मेसेज पाठवला. अल्बममध्ये तुला संधी देईन, असं या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं. या मेसेजनंतर दोघांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. अल्बमबाबत अधिक चर्चा करण्यासाठी त्यांनी म्युझिक स्टुडिओमध्ये बोलावल्याचं तरुणीनं म्हटलंय. स्टुडिओमध्ये भेटीगाठी दरम्यान सचिन यांनी तिला अचानक लग्नाची मागणी घातली. लग्नाचं आमीष दाखवून लैंगिक अत्याचार केला... त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात करायला लावला, असा आरोपही तरुणीनं तक्रारीत केला आहे. त्यानंतर मात्र, सचिन यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं तरुणीनं तक्रार केली..."
View this post on Instagram
अटकेनंतर गायकाला काही तासांतच जामीन
तरुणीच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील तपासासाठी हे प्रकरण सांताक्रूझ पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आलं. अखेर पोलीस तपासानंतर सचिन संघवीला अटक करण्यात आली. मात्र, अटकेनंतर काही तासांतच सचिनला जामिनावर सोडण्यात आलं. सचिन संघवी हा मूळचा गुजरातमधील असून, त्यानं अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिलं आहे.
दरम्यान, सचिन संघवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सचिन संघवी हा मुळचा गुजरातचा असून सध्या तो महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. आतापर्यंत सचिननं एआर रहमान, अमित त्रिवेदी, अनु मलिक, नदीम श्रवण, संदेश शांडिल्य यांसारख्या नावाजलेल्या संगीतकारांसोबत काम केलंय. तसेच, अनेक सुपरहिट गाणीही इंडस्ट्रीला दिलीत. सचिन संघवीनं बॉलिवूडच्या 'जयंती भाई की लव्ह स्टोरी', 'हिम्मतवाला', 'ओह माय गॉड', 'तेरे नाल लव हो गया', 'क्या सुपर कूल है हम', 'अजब गजब लव', 'एबीसीडी', 'शुद्ध देसी रोमान्स', 'मी और मै', 'गो गोवा गॉन', 'रमैया वस्तावया' यांसारख्या सुपरहिट सिनेमांतल्या गाण्यांना संगीत दिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















