Fifa World Cup: नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज
Nora Fatehi Song: फिफा विश्वचषक 2026 साठी नोरा फतेहीचे नवीन गाणे Siir Siir प्रदर्शित झाले आहे.

Fifa World Cup 2026: नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांसाठी एक गुडन्यूज. अभिनेत्रीचं नवीन गाणं 'सीर सीर' (Siir Siir) फिफा विश्वचषक 2026 (Fifa World Cup 2026) साठी प्रदर्शित झाले आहे. 'सीर सीर' हे गाणं फिफा विश्वचषक 2026 च्या ऑफिशियल म्युझिक (Entertainment) प्रोजेक्टचा भाग असून, या गाण्याचा समावेश टूर्नामेंटच्या ऑफिशियल अल्बममध्ये करण्यात आला आहे. संगीत निर्माता संजय आणि गायक वेगड्रीम यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या गाण्यासाठी, जगभरातील कलाकारांना एकत्र आणण्यात आले आहे. या गाण्याला इतके प्रेम मिळाले की, 18 तासांत व्हिडीओला 6.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे.
जगभरात या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. 18 तासांत मिलियनच्या घरात व्ह्यूज मिळवत या गाण्यानं नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जून रोजी नोरा फतेही टोरंटो येथील आउटडोअर स्टेडिअम BMO फिल्डमध्ये फीफा वर्ल्ड कप 2026 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्म करणार आहे. विशेष म्हणजे, कतार विश्वचषकादरम्यान, एका फॅन इव्हेंटमध्ये परफॉर्म केल्यानंतर, फिफामधील हे नोरा फतेहीचे आणखी एक सादरीकरण असेल. तिच्या या सादरीकरणाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
फिफा 2026 मध्ये Siir Siir गाण्याची क्रेझ (Bollywood Nora Fatehi Fifa world cup 2026)
View this post on Instagram
इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, 'सीर सीर' या गाण्याविषयी बोलताना नोरा फतेही म्हणाली की, 'हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. हे गाणं विविध संस्कृतींचे मिश्रण म्हणून करण्यात आले आहे. तसेच या गाण्याचे वेगळेपणा कायम ठेवत ते जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे उद्दीष्ट आहे', असं नोरा म्हणाली. 'या गाण्याच्या बिहाइंड द सीनमध्ये इंडियन रिप्रजेंटेशनमुळे या गाण्याला अधिक अर्थपूर्ण बनवले आहे. या मागे भारतीय कोरिग्राफरपासून डान्सरपर्यंत सर्वांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे'.
नोरा फतेहीचं हे गाणं सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. या गाण्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'फिफा अल्बममधील हे बेस्ट अल्बम आहे' असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. 'भारतीय मित्रहो, पुढे या अन् आपल्या दिलबर नोराला सपोर्ट करा', असं एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. सध्या नोराचं हे गाणं सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















