Ratan Tata Borrowed Some Money From Amitabh Bachchan: प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं निधन होऊन तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण, त्यांचे किस्से, त्यांचा साधेपणा आजही अनेकांच्या चेहऱ्यावर हासू आणतात. रतन टाटा आणि त्यांचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. त्यापैकी रतन टाटा आणि बॉलिवूड (Bollywood News) या समीकरणाबाबतही तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. सिमी गरेवालसोबतचं (Simi Garewal) त्याचं अफेअर तर सर्वश्रुतच. पण, याव्यतिरिक्तही रतन टाटा (Famous Businessman Ratan Tata) आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींचे (Bollywood Celebrities) घनिष्ठ संबंध होते. त्यापैकीच एक बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन. प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी स्वतः यासंदर्भात खुलासा केला आहे. 

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता या जगात नाहीत, पण त्यांच्याशी संबंधित किस्से अजूनही अनेकांच्या लक्षात आहेत. अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये रतन टाटा यांच्याशी संबंधित एक किस्सा सर्वांना सांगितला होता. त्यांनी सांगितलं की, लंडन विमानतळावर रतन टाटा यांना एक फोन करायचा होता, त्यासाठी त्यांनी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते. अमिताभ बच्चन यांनी किस्सा सांगताना रतन टाटा यांच्या साधेपणाचे कौतुक केलं.

'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये फराह खान आणि बोमन इराणी यांच्याशी बोलताना अमिताभ बच्चन यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. त्यांच्या साधेपणाचं आणि नम्र वागण्याचं कौतुक केलं. दोघेही लंडन विमानतळावर भेटले आणि एकाच विमानानं प्रवास केला. हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर, रतन टाटा त्यांच्या असिस्टंटला खूप शोधत होते, पण तो काही त्यांना सापडत नव्हता. रतन टाटा यांना त्याला फोन करायचा होता.

रतन टाटांनी बिग बींकडे मागितले पैसे

अमिताभ बच्चन म्हणाले की, "तो एका फोन बूथवर गेला होता. आणि मी जवळच होतो. काही वेळानं तो बाहेर आला. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की, अमिताभ, मी तुमच्याकडून काही पैसे उधार घेऊ शकतो का? माझ्याकडे फोन करण्यासाठी पैसे नाहीत. त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं की, एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी अभिनेत्याच्या मित्राला घराबाहेर पडण्यास सांगितलं होतं, जे ऐकून ते थक्क झाले, कारण ते खूप मोठे उद्योगपती होते.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सर्वात शेवटी ते 'वेट्टाय्यां' या सिनेमात दिसले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन बऱ्याच वर्षांनी रुपेरी पडद्यावर दिसले. याशिवाय, ते सध्या 'कलकी 2898 एडी'चा दुसरा भाग आणि 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार आहेत, जे येत्या काही वर्षांत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतील. सध्या ते 'कौन बनेगा करोडपती'च्या पुढील सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Best Thriller Movie On OTT: 10 तास, एक मुलगी अन् धावती बस... OTT वरची डोकं फोडणारी थ्रिलर फिल्म, 1 तास 58 मिनटांमधील एक-एक सीन जबरदस्त