Bollywood : अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री जूही चावला यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडीही प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय होती. मात्र, त्यांच्या जोडीतील एक गाणं मात्र प्रचंड वादात सापडलं होतं. या दोघांवर चित्रित झालेलं एक गाणं असं आहे की आजही कोणी ऐकलं, तर कानांवर हात ठेवतील. या गाण्याने तर सेंसर बोर्डलाही हादरवून सोडलं होतं.
90च्या दशकात चित्रपटांमध्ये डबल मीनिंग गाणी आणि डायलॉग्सचा ट्रेंड सुरू झाला होता. अनिल आणि जूहीच्या चित्रपटातील हे गाणं देखील अशाच गाण्यांपैकी एक होतं. अश्लीलतेची सीमा गाठणाऱ्या या गाण्याने, करिश्मा कपूरच्या ‘सरकाई लो खटिया’ (राजा बाबू) सारख्या गाण्यांनाही मागे टाकलं होतं. पण या गाण्याने त्या ट्रेंडला आणखी वेगळ्या स्टेजला नेलं.
आपण बोलत आहोत 1994 साली प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर आणि जूही चावला यांच्या ‘अंदाज’ या चित्रपटाबद्दल. या चित्रपटात या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, या चित्रपटातील एक गाणं आजही चर्चेचा विषय ठरतं “Malgadi Tu Dhakka Laga” या गाण्यात अनिल आणि जूहीने असे काही डान्स मूव्हज केले आहेत, जे अत्यंत वादग्रस्त ठरले. गाण्याचे प्रत्येक शब्द अश्लील आणि दुहेरी अर्थ असणारे आहेत. त्याकाळी टीव्ही चॅनल्सही हे गाणं दाखवायला घाबरत होते.
हे गाणं सेंसर बोर्डसाठी डोकेदुखी ठरलं होतं
हे गाणं पाहणारे आणि ऐकणारे लोक ते सहज विसरत नाहीत. काही लोकांना हे गाणं मस्ती आणि मजेशीर वाटतं, तर काही लोकांच्या मते हे त्या काळातील सर्वात अश्लील आणि दुहेरी अर्थांनी भरलेलं गाणं होतं. खरं सांगायचं झालं, तर गाण्याचे शब्दच नव्हे तर त्याचं चित्रिकरण, अनिल-जूहीच्या हालचालींनी त्याला अशा प्रकारचं तडका दिला, की ते सेंसर बोर्डलाही सहन झालं नाही.
‘Malgadi Tu Dhakka Laga’ गाण्याला मिळालेली लोकप्रियता, थिएटरमध्ये होणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्या यावरून प्रेक्षक किती ‘एंटरटेन’ झाले हे स्पष्ट होतं. पण त्याच वेळी, टीव्हीवर ते दाखवताना चॅनल्सना संकोच वाटत असे. सेंसर बोर्डने देखील या गाण्यावर आक्षेप घेतला होता आणि त्यात काही कट्स करण्याची मागणी केली होती. गाण्यात वापरलेली भाषा आणि हावभाव यावर अनेक महिला संघटनांनी निषेध नोंदवला होता. त्यांनी हे गाणं महिलांचा अपमान करणारे असल्याचं म्हटलं होतं आणि अशा प्रकारच्या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणं केवळ मजेशीर आणि हलक्याफुलक्या अंदाजात चित्रित केलं आहे, असं सांगत बचाव केला होता. जेव्हा जेव्हा बॉलिवूडमधील बोल्ड आणि बेसावध गाण्यांची चर्चा होईल, तेव्हा 'अंदाज'मधील हे गाणं नेहमीच वरच्या स्थानावर राहील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वयाच्या 22 व्या वर्षानंतर पाय सुजू लागले, सैराट फेम तानाजी गळगुंडेच्या पायाच्या 7 सर्जरी; तरीही चालवतो सायकल