bollywood : महानायक अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री लक्ष्मी मंचू आज ईडी समोर हजर झाली. बेटिंग अॅप प्रमोशन प्रकरणात ईडीकडून लक्ष्मीची चौकशी सुरु आहे लक्ष्मी सकाळी सुमारे 10.30 वाजता हैदराबादच्या बशीरबाग येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात पोहोचली. याआधी ईडीने बेटिंग अॅप प्रकरणात राणा दग्गुबाती, विजय देवरकोंडा आणि प्रकाश राज यांची 4-5 तास चौकशी केली होती. ईडी अधिकाऱ्यांनी लक्ष्मीला सट्टेबाजी अॅप्सच्या जाहिराती, तिच्याकडून साइन केलेले करार आणि मिळालेल्या मानधनाबद्दल विचारणा केली. केंद्रीय यंत्रणेने तिचा जबाब नोंदवला आणि आर्थिक व्यवहारांविषयीही चौकशी केली. या प्रकरणात ईडीसमोर हजर होणारी मंचू लक्ष्मी ही चौथी कलाकार आहे. ती तेलुगू स्टार विष्णू मंचू आणि मंचू मनोज यांची बहीण आहे.
याआधी प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबाती हे देखील ईडीसमोर हजर झाले होते. त्यांची 4-5 तास चौकशी करण्यात आली होती. राणा दग्गुबातीची सोमवारी जवळपास चार तास विचारपूस झाली. गेल्या महिन्यात ईडीने राणा दग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि मंचू लक्ष्मी यांना या प्रकरणात समन्स बजावले होते. प्रकाश राज 30 जुलैला, तर विजय देवरकोंडा 6 ऑगस्टला ईडीसमोर हजर झाले होते.
29 प्रसिद्ध व्यक्तींवर बेटिंग अॅप प्रकरणात गुन्हा नोंद
या प्रकरणात 29 प्रसिद्ध व्यक्ती – ज्यामध्ये अभिनेते, प्रसिद्ध व्यक्ती आणि यूट्यूबर्स यांचा समावेश आहे – यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर सट्टेबाजी अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे, जो सार्वजनिक जुगार कायदा, 1867 चे उल्लंघन करतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये नोंदवलेल्या पाच एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला आहे.
मार्च 2024 मध्ये विजय देवरकोंडा-प्रकाश राज यांच्यासह अनेकांवर गुन्हा नोंद
मार्च 2024 मध्ये सायबराबाद पोलिसांनी विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, प्रकाश राज आणि इतरांविरुद्ध बेटिंग अॅप्सचा प्रचार केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता. राणा आणि विजय यांनी दावा केला की त्यांनी फक्त कायदेशीर ऑनलाइन स्किल-बेस्ड गेम्सचाच प्रचार केला होता. 6 ऑगस्टला चौकशीनंतर विजय देवरकोंडाने सांगितले की त्याने सरकार मान्यताप्राप्त आणि परवाना घेतलेल्या गेमिंग अॅपचा प्रचार केला होता. त्याने आपल्या बँक खात्याची, कंपनीची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती दिली. प्रकाश राज यांनी सांगितले की 2016 मध्ये त्यांनी एका गेमिंग अॅपची जाहिरात केली होती, मात्र नैतिक कारणांमुळे कोणतेही मानधन घेतले नव्हते आणि नंतर त्याचा प्रचारही थांबवला होता. सध्या ईडी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि प्रचाराशी संबंधित गोष्टींची सखोल चौकशी करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमिताभ बच्चन, सलमानसह 'या' 5 अभिनेत्री किडनी-डोळे दान करणार, एका सुपरस्टारमुळे दोघांना मिळाले डोळे