Bollywood Actress Fees: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि त्यांचे ग्लॅमरस आऊटफिट्स, त्यांची लग्झरी लाईफस्टाईल याबाबत चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. याव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांनी एखाद्या चित्रपटासाठी घेतलेलं मानधन (Bollywood actress Fees) याबाबतही सर्वांना उत्सुकता लागलेली असते. अशीच एक अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. खरंतर ही अभिनेत्री इंडस्ट्रीत तशी नवखीच आहे. पण, तिनं तिच्या अभिनयाच्या जोरावर अवघ्या काही काळातच बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवलं. एवढंच नाहीतर, या अभिनेत्रीनं बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोणलाही (Deepika Padukon) रिप्लेस केलं आहे. हिच्या मानधनाबाबत बोलायचं झालं तर, काही वर्षांपूर्वीच फक्त काही लाखांत मानधन घेणारी ही नवखी अभिनेत्री आता कोट्यवधींच्या घरात मानधन घेते.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव तृप्ती डिमरी (Tripti Dimri). बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Bollywood Actress Tripti Dimri) सध्या चर्चेत आहे. 2023 मध्ये रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटात तिच्या छोट्याशा भूमिकेनं एका रात्रीत स्टार बनली. तृप्ती लवकरच एक मोठा टप्पा गाठणार आहे. संदीप रेड्डी वांगाच्या बहुचर्चित चित्रपट 'स्पिरिट'मध्ये तृप्ती डिमरी दीपिका पदुकोणला रिप्लेस करणार आहे. या केवळ चर्चा नसून याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. तृप्ती डिमरी 'स्पिरिट'मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी तिनं घेतलेलं मानधन आतापर्यंत 'अॅनिमल' चित्रपटापासून 10 पटीनं वाढलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 2023 मध्ये आलेल्या 'अॅनिमल'मध्ये तृप्ती डिमरीनं अगदी छोटीशी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. 'अॅनिमल'साठी तृप्तीनं सुमारे 40 लाख रुपयांची फी घेतली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, 'अॅनिमल'नंतर तृप्तीनं तिच्या मानधनात वाढ केली आणि 'बॅड न्यूज'साठी 80 लाख रुपये आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ'साठी 1 कोटी रुपये घेतले. आता 'स्पिरिट'साठी तृप्तीनं घेतलेल्या मानधनाच्या चर्चा रंगल्या आहेत. 'स्पिरिट'साठी तृप्तीनं 4 कोटी रुपये घेतले असल्याचं सांगितलं जातंय, जे तिच्या पहिल्या सिनेमाच्या मानधनापेक्षा 10 पट जास्त आहे. दरम्यान, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. ही माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देत आहोत.
दरम्यान, 'स्पिरिट' सिनेमाची चर्चा त्यावेळी सर्वाधिक रंगली, ज्यावेळी बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोणनं या फिल्मसाठी 20 कोटी रुपयांचं मानधन आणि 6-8 तासांच्या शिफ्टची मागणी केली. याव्यतिरिक्त दीपिकानं फिल्मच्या नफ्यातीलही काही भाग मागितला होता. दीपिकाच्या या अटी-शर्थी दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना धुडकावून लावल्या. त्यानंतर 'स्पिरिट'मधून दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि 'स्पिरिट' सिनेमा तृ्प्तीच्या पदरात पडला. आता दीपिकाऐवजी तृप्ती या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सहाजिकच तृप्तीचं इंडस्ट्रीतलं वजन वाढणार, यात शंका नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
