एक्स्प्लोर

Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूड अभिनेत्रीचं वादळी आयुष्य, सहा लग्न मोडल्यानंतर सातव्यांदा थाटला संसार, पण नशीबी आली सवत, आयुष्यभर केला तडजोडीचा संसार

Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लग्न एकदा नाहीतर, तब्बल सहा वेळा मोडलं... त्यानंतर सातव्यांदा तिनं संसार थाटला, पण नशीबात सवत होती.

Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूड (Bollywood News) इंडस्ट्रीपासून ते अगदी साऊथ इंडस्ट्रीपर्यंत (South Film Industry) अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याबाबतचे किस्से, वेगवेगळे प्रसंग नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. पण, इंडस्ट्रीत अनेक असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी आपली पर्सनल लाईफ, वैवाहिक आयुष्य, लव्ह लाईफ, अफेअर्सबाबत चर्चेत असतात. इंडस्ट्रीमध्ये संजय दत्तपासून (Sunjay Dutt) अगदी कबीर बेदींपर्यंत (Kabir Bedi) अनेक असे अभिनेते आहेत, ज्यांची एक, दोन नाहीतर यापेक्षाही अधिक लग्न झालीत. अशा अनेक अभिनेत्रीसुद्धा आहेत. पण, तुम्हाला माहितीय का? एक अशी इंडस्ट्रीमधील स्टार आहे, जिची एका, दोन नाहीतर तब्बल सहा लग्न मोडलीत. त्यानंतर सातवं लग्न झालं, पण तिथेही आयुष्यभर तडजोडच करावी लागली. 

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगतोय, तिचं नाव सोनिका गिल (Sonika Gill). तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच (Professional Life) तिचं वैयक्तिक आयुष्यही (Personal life) चर्चेचा विषय ठरलं. बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अदांनी आणि दमदार अभिनयानं ओळख निर्माण करणाऱ्या सोनिका गिल (Sonika Gill) आपल्या लग्नामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. मीडिया रिपोर्टनुसार, सोनिका यांची तब्बल सहा लग्न मोडली, त्यानंतर कुठे नशीब उजळलं आणि त्यांनी सातव्यांदा संसार थाटला. पण, इथेही नियतीनं मात्र वेगळंच लिहून ठेवलेलं. सातव्यांदा संसार थाटला (Actress Living Marriage Defined By Compromise), पण तिथे नवऱ्यासोबत सवतही होती. मग काय, त्यांनी आयुष्यभर तडजोडीसह संसार थाटला. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या जोरदार चर्चा रंगलेल्या. 

Sonika Gill - IMDb

'राम लखन'मधील छोट्याशा भूमिकेनं प्रसिद्धी मिळवलेल्या सोनिका गिल यांनी पुढे 'रात के गुनाह', 'तू नागिन मैं सपेरा', 'लाश', 'कच्ची कली', 'कौन करे कुर्बान', 'घर हो तो ऐसा' आणि तिरंगा यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांचं वैयक्तिक आयुष्य अधिक चर्चेत राहिलं.

अनिल कपूर यांच्यासोबत 'राम-लखन'मध्ये झळकलेली सोनिका गिल (Anil Kapoor Ram Lakhan Movie)

बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री सोनिका गिल यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'राम-लखन' सिनेमातून आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली. हा तिचा पहिलाच सिनेमा होता. यात तिनं केवळ सहाय्यक भूमिका साकारली असली, तरीही पडद्यावर कमी वेळ असूनही आपल्या ठसकेबाज व्यक्तिमत्त्वामुळे तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 

1-2 नहीं 6 बार टूटी शादी, 7वीं बार में बसा घर तो पति के साथ मिली सौतन, आज 3 बच्चों की मां है एक्ट्रेस - News18 हिंदी

सोनिका गिल यांचे सिनेमे (Sonika Gill Movies)

अभिनेत्री सोनिका गिल 'राम-लखन' सिनेमामुळे बऱ्याच चर्चेत आल्या. प्रेमात पाडणारे डोळे आणि दमदार अभिनयामुळे अप्लावधीतच त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. 'राम-लखन' व्यतिरिक्त, तिच्या सिने कारकिर्दीत 'रात के गुनाह', 'तू नागिन मैं सपेरा', 'लाश', 'कच्ची कली', 'कौन करे कुर्बान', 'घर हो तो ऐसा' आणि 'तिरंगा' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

एका अपघातानं बदललं आयुष्य (Actress Sonika Gill Life Story)

सोनिका गिल यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं तर, त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. एका रस्ते अपघातानं तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. या अपघातानंतर तिला अनेक सिनेमांचे प्रोजेक्ट्स गमवावे लागले, ज्यामध्ये संजय दत्तच्या 'खलनायक'चाही समावेश होता. अखेर त्या परदेशात गेल्या आणि तिथेच स्थायिक झाल्या.

सहा लग्न मोडली, तेव्हा कुठे सातव्यांदा थाटला संसार (Sonika Gill Six Marriages Failed)

दुबईला स्थायिक झाल्यानंतर, या अभिनेत्रीनं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तोपर्यंत तिची सहा लग्नं अयशस्वी ठरली होती. जेव्हा तिचं सातवं लग्न ठरलं, तेव्हा तिला तिच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीशी जुळवून घेऊन राहावं लागलं.

बिझनेसमनशी सातव्यांदा थाटला संसार 

सोनिका गिल यांची यापूर्वी सहा वेळा लग्न ठरली होती, पण काही ना काही कारणांमुळे ती मोडली. सातवं लग्न होण्यापूर्वी त्यांनी एक धार्मिक विधी केलेला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलेलं की, एका पुरोहितानं त्यांना मंगळ असल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळेच तिच्या लग्नांमध्ये अडथळे येत होते. अखेरीस, तिनं प्रसिद्ध बिझनेसमन मितेश रुगानी यांच्यासोबत संसार थाटला.  

सवतीसोबत थाटला तडजोडीचा संसार

बिझनेसमन मितेश रुगानी यांचं आधीच लग्न झालं होतं आणि त्यातून त्यांना दोन मुलं होती. तसेच, त्यांना आणि सोनिकालाही एक मुलगी आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीनं तिचे पती आणि त्यांची पहिली पत्नी यांच्याबद्दल बोलताना सांगितलेलं की, ते सर्वजण एकाच कुटुंबात एकत्र राहतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Superstar Madhuri Dixit Life Story: दूरदर्शननं नाकारलं, पहिला सिनेमाही ठरला सुपरफ्लॉप; पण तरीही 'ती' बनली बॉलिवूडची 'लेडी सुपरस्टार'; ओळखलं का कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget