Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या चित्रपटांसाठी किंवा सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी कमी आणि त्यांच्या सौंदर्य, फिटनेससाठी जास्त ओळखल्या जातात. अशीच एक 90 च्या दशकातील बॉलिवूडची सौंदर्यवती, जिनं नुकताच तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती तिच्या वडिलांच्या मांडीवर बसलेली दिसतेय. या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पाय ठेवलं, ते किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही, तिनं अक्षय कुमारसोबत अनेक हिट चित्रपट दिलेत. त्या काळात दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरलेला. असं सांगितलं जातं की, दोघेही एकमेकांसोबत लग्न करणार होते, पण काय झालं कुणास ठाऊक... दोघांनीही आपल्या वेगवेगळ्या वाटा धरल्या. अक्षय कुमारनं राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. तर या अभिनेत्रीनं बिझनेसमनसोबत आपली लग्नगाठ बांधली. आज ही अभिनेत्री 150 कोटींची मालकीण आहे.
फोटोत दिसणारी चिमुकली कोण?
काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांच्या पुण्यातिथीनिमित्त अभिनेत्रीनं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती वडिलांसोबत दिसतेय. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीनं लिहिलंय की, "मला तुमचं हे स्मित आठवते, मला तुमचीही आठवण येते, बाबा, 9 वर्ष झाली..."
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शिल्पा शेट्टी आहे, जिनं शाहरुख खान आणि काजोल स्टारर 'बाजीगर' चित्रपटातून डेब्यू केलेला. त्यानंतर तिनं अक्षय कुमारसोबत अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. असं सांगितलं जातं की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. पण लग्न मात्र केलं नाही. अखेर अभिनेत्रीनं प्रसिद्ध बिझनेसमनसोबत आपली लग्नगाठ बांधली. पण, सध्या शिल्पा शेट्टी मोठ्या अडचणींना तोंड देतेय. तिचा पती राज कुंद्रावर पोर्नोग्राफीचा आरोप झालेत. तसेच, नुकतीच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या 60 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. तसेच, परदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आली आहे.
शिल्पा शेट्टीचं नेटवर्थ
मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीचं नेटवर्थ 134 ते 150 कोटी रुपये आहे. आता तुम्ही म्हणाल की, हिचे सिनेमे तर येत नाहीत, मग एवढी कमाई कशी होते? तर शिल्पा शेट्टी सिनेमांमधून कमी आणि जाहिरातींमधून जास्त कमाई करते. तिचं स्वतःचं एक रेस्टॉरंटही आहे आणि अभिनेत्रीचं एक फिटनेस अॅपही आहे. शिल्पा ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 कोटींहून अधिक पैसे घेते. तिचा शेवटचा हिट सिनेमा अपने (2007) मध्ये आलेला. या सिनेमात तिनं सनी देओलसोबत स्क्रिन शेअर केलेली. त्यानंतर मात्र ती कोणत्याही हिट सिनेमात दिसली नाही. आता शिल्पा फिल्म केडी- द डेविल (2025) मध्ये दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :