Sanya Malhotra Breakup Rumours: 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्राचं ब्रेकअप? वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर 'या' लोकप्रिय आर्टिस्टला सोडल्याच्या चर्चा, सोशल मीडियावरही केलं अनफॉलो
जवळपास एका वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांनी ब्रेकअप केल्याचं सांगितलं जात आहे.

Sanya Malhotra Breakup Rumours: दंगल गर्ल सान्या मल्होत्रा गेला काही दिवसांपासून तिच्या नव्या घरामुळे चर्चेत होती. आता आणखी एका गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्रा ( Sanya Malhotra) हिचं बेकअप झाल्याचं बोललं जात आहे. गेल्या वर्षभरापासून ती एका प्रसिद्ध कलाकाराला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.मात्र आता त्या दोघांनीही आपापले मार्ग वेगळे केल्याचे सांगितलं जात आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफोलो केल्याची ही चर्चा आहे. निमित्ताने अनेकांना प्रश्न पडलाय की सान्या नेमकं कोणाला डेट करत होती? (Sanya Malhotra Breakup Buzz)
अभिनेत्री सान्या मल्होत्रा सितारवादक आणि सोशल मीडियावर 'सितार फॉर मेंटल हेल्थ' नावाने प्रसिद्ध असलेला ऋषभ रिखीराम शर्मा( Rishabh Sharma) याला डेट करत असल्याची चर्चा होती. जवळपास एका वर्षापासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र आता त्यांनी ब्रेकअप केल्याचं सांगितलं जात आहे.
सान्या-ऋषभ वेगळे झाल्याच्या चर्चा
सान्या आणि ऋषभ यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे काही सांगितलं नव्हतं. दोघेही आपलं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवत होते. काही वेळा ते एकत्र दिसले होते, मात्र कपल म्हणून ते कधीच खुलेपणाने समोर आले नाहीत. आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोही केलं आहे आणि आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. तसेच, ऋषभ आता नव्या नात्यात असल्याचंही म्हटलं जात आहे. या सर्व चर्चांवर दोघांनीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सान्या ऋषभच्या नात्याची अफवा
सान्या आणि ऋषभ यांच्या रिलेशनशिपच्या अफवा 2025 मध्ये सुरू झाल्या होत्या. त्यावेळी दोघे एकाच लोकेशनवर स्पॉट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका फोटोमध्ये ऋषभ एका फॅनसोबत फोटो काढताना दिसत होता, तर सान्या बाजूला उभी होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. पुढे दोघे एका इव्हेंटमध्येही दिसले होते. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2024 पासून ते एकमेकांना ओळखत होते.
सान्या ऋषभच्या कामाविषयी ...
सान्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, 2025 मध्ये ती ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसली होती. आता ती Netflix वरील ‘टोस्टर’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 15 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. तर ऋषभ सध्या आपल्या संगीतावर लक्ष केंद्रित करत आहे. भारतभर त्याचे कॉन्सर्ट सुरू आहेत. त्याचा कॉन्सर्टला अनेक मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसत आहेत.





















