मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka chopra) हिंदी कलाविश्वासोबतच हॉलिवूडमध्येती तितक्याच भक्कमपणे पाय रोवले. इतकंच नव्हे, तर मराठी चित्रपट वर्तुळातही निर्माती म्हणऊन ती सर्वांसमोर आली. अशी ही अभिनेत्री लवकरच तिच्या 'अनफिनिश्ड' (Unfinished) या आत्मचरित्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी तिनं या पुस्तकातील एक संदर्भ सोशल मीडियावर शेअर केला आहे.


2019 मध्ये कान्सच्या रेडकार्पेट सोहळ्यादरम्यानचा हा किस्सा तिनं सर्वांपुढे आणला. कान्स सोहळ्यासाठी प्रियांकानं 2019 मध्ये ज्या डिझायनर ड्रेसला पसंती दिली होती, त्याचसंबंधीचा हा किस्सा. रेड कार्पेट वॉकसाठी येण्याच्या काही क्षणांपूर्वीच प्रियांकाच्या या ड्रेसच्या झिपरनं काम करणं बंद केलं होतं. याबाबत लिहिताना देसी गर्ल प्रियांका म्हणते, 'मी बाहेरून कितीही शांत आणि निवांत दिसत असले तरीही त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते.'


तिनं पुढे लिहिलं, '@roberto_cavalli च्या या विंटेज ड्रेसला असणारा नाजुक झिपर रेड कार्पेटवर जाण्याच्या काही क्षण आधीच तुटला. आता यावर उपाय काय? त्याचवेळी माझ्या टीमला एक उपाय सुचला. त्यांनी वाटेतच अवघ्या पाच मिनिटांच्या वाटेदरम्यानच माझ्या ड्रेसला शिवण घातलं आणि परिस्थिती निभावून नेली'. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्त्व करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या क्षणांपैकीच तो एक क्षण होता. पण, त्याचवेळी आलेली ही अडचण प्रियांकाला धडकी भरवून गेली होती. त्यातही तिनं आत्मविशानं निर्णय घेत आपलं वेगळेपण सिद्ध केल्याचं पाहायला मिळालं होतं.





Union Budget 2021 | आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; राष्ट्रपती अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार


एक अभिनेत्री किंवा एक सेलिब्रिटी म्हणून या मंडळींच्या वाट्याला आलेलं यश, त्यांच्या अवतीभोवती असणारा झगमगाट आणि त्यांचं आयुष्य याचविषयी कायम अनेकांना कुतूहल असतं. पण, त्यामागे प्रचंड मेहनत आणि संकटांवर मात करण्याची वृत्तीसुद्धा कामी लागलेली असते ही बाब नाकारता येत नाही.