Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूडचा (Bollywood News) पडदा जेवढा ग्लॅमरस वाटतो, तेवढीच त्याची दुसरी बाजू काळ्याकुट्ट अंधारानं व्यापलेली आहे, हे आपण सर्वच जाणतो. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrity) आपल्या चांगल्या-वाईट अनुभवांबाबत जाहीरपणे सांगितलंय. अशातही एखादी व्यक्ती या बॉलिवूडच्या झगमगत्या जगात आलीच, तर इथे नाव कमावणं आणि यशाचं सर्वोच्च शिखर गाठणं वाटतं तेवढं सोपं नाही. कित्येकांचं स्वप्न असतं बॉलिवूडमध्ये यावं आणि या ग्लॅमरस दुनियेत स्टार व्हावं. पण, परिस्थितीमुळे या क्षेत्रात पाऊल ठेवणारे फार कमीच असतात. तरीही, सुरुवातीला इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसतानाही, ही माणसं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे, हिंदी सिनेसृष्टीतील (Hindi Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री लीला चिटणीस (Leela Chitnis). लीला चिटणीस यांचा जन्म 9 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील धारवाड इथे एका मराठी भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. पण, पुढे याच नावाला हिंदी सिनेसृष्टीतलं ग्लॅमर मिळालं. 

Continues below advertisement

लीला चिटणीस (Actress Leela Chitnis) यांचं लग्नापूर्वीचं नाव लीला नगरकर, असं होतं. त्यांचे वडील इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. लीला यांचा जन्म अशा काळात झाला होता, जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जात नव्हतं. त्या काळात त्यांनी 'बॅचलर ऑफ आर्ट्स' (BA) पदवी संपादन केली. जी स्वतःच एक मोठी कामगिरी होती. या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवीधर होण्याचा मानही त्यांना मिळाला.

घटस्फोटानंतर चार मुलांची खांद्यावर जबाबदारी (Actress Leela Chitnis Struggle Life)

Continues below advertisement

लीला यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी डॉ. गजानन यशवंत चिटणीस यांच्याशी विवाह केला आणि त्यांना चार मुलं झाली. या काळात, ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्याच्या कार्यातही त्यांनी आपल्या पतीची साथ दिली. मात्र, पतीच्या व्यसनांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि अखेर त्यांनी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत, घटस्फोट घेतला. त्यानंतर चार मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी लीला यांच्यावर येऊन पडली. आता करायचं काय? हा प्रश्न डोंगराएवढ्या समस्यांसह समोर उभा होता. त्या काळात एकट्या बाईनं चार मुलांचा सांभाळ करणं, फारसं सोपं नव्हतं. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करावा लागला. घटस्फोटानंतर, त्यांनी सुरुवातीला काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी केली आणि त्यानंतर 'नाट्य मन्वंतर' या नाट्यसंस्थेशी त्या जोडल्या गेल्या. अखेर त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं.

लीला यांनी 1935 मध्ये 'श्री सत्यनारायण' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण, 1937 मधील 'जेंटलमन डाकू' सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. 1939 मधील 'कंगन' सिनेमा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला 'सिल्व्हर ज्युबिली' हिट ठरला आणि त्याद्वारे त्या त्या काळातील एक प्रमुख, लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रस्थापित झाल्या. 

1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात, त्यांनी चरित्र भूमिका (Character Roles) साकारण्यास सुरुवात केली. 'शहीद' हा त्यांच्या कारकिर्दीतील असा पहिला सिनेमा होता, ज्यात त्यांनी आईची भूमिका साकारली. त्यानंतर त्यांनी 'आवारा', 'गंगा जमुना', 'गाईड', 'नया दौर', 'साधना' आणि 'हम दोनों' यांसारख्या अनेक यशस्वी सिनेमांमध्ये दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका समर्थपणे साकारली.

लक्सची जाहीरात मिळाली अन्... (Leela Chitnis Became Bollywood Favorite Mother)

1941 मध्ये 'लक्स' (Lux) साबणाच्या जाहिरातीत झळकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरल्या. 1930 ते 1980 च्या दशकापर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. विद्यापीठाची पदवी घेणाऱ्या बॉलिवूडमधील पहिल्या काही प्रमुख आणि मोजक्याच अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 1980 च्या दशकानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतली. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्या अमेरिकेत आपल्या मुलांसोबत राहत होत्या. अमेरिकेतच कधीकाळी हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या या दमदार अभिनेत्रीनं 14 जुलै 2003 रोजी अखेरचा श्वास घेतला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actress Sonam Khan Struggle Life: 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत डेब्यू, कामचं असं केलं की, रातोंरात चर्चेत आली; 20 व्या वर्षी झाली आई, तेव्हापासूनच इंडस्ट्रीतून गायब 'ही' अभिनेत्री