मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत चर्चेत येण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी कोणा एका मुद्द्यावर परखडपणे व्यक्त झाल्यामुळे कंगना चर्चेत येते, तर कधी एखाद्या सोशल मीडिया पोस्टमुळे. सध्या ती चर्चेत आली आहे ते म्हणजे प्रसादाच्या थाळीमुळे. 


सध्या सुरु असणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या पर्वातील अष्टमीच्या दिवशी कंगनानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिनं प्रसादाची थाळी सर्वांपुढे आणली. या थाळीमध्ये शिरा, पुरी, खीर अशा पदार्थांसोबतच कांदा आणि मिरचीही दिसली. प्रसादाच्या थाळीमध्ये कांदा आणि मिरची दिसून येताच, ही बाबत अनेकांनाच खटकली. 


प्रसादाच्या पदार्थांमध्ये कांदाही असल्यामुळं मग कंगनावर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. तिची खिल्लीही उडवली. या विषयाचा इतकी चालमा मिळाली की चक्क कांदा ट्विटरवर ट्रेंडमध्येही आला. हे सारं पाहून अखेर बी- टाऊनच्या या क्वीननं तिच्याच अंदाजात नेटकऱ्यांना उत्तर दिलं. 


Rama Navami 2021 | ऑनस्क्रीन 'राम' साकारून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले 'हे' अभिनेते 


'मला विश्वासच बसत नाहीये, की #Onion हा सर्व ट्रेंड्सपैकी एक आहे. पण, हे कोणालाही दुखावण्यासाठी केलेलं नाही. हिंदू धर्माचं हेच सौंदर्य आहे की तो इतर धर्मांप्रमाणं कठोर नाही. ते सौंदर्य बाधित नको करुया. मी आज उपवास करतेय आणि माझ्या कुटुंबाला प्रसादासोबत सॅलड खायची इच्छा असेल तर, यासाठी त्यांची खिल्ली उडवली जाऊ ने', असं ट्विट तिनं केलं. 






कंगनानं अष्टमीच्या निमित्तानं सर्वांनाच या पर्वाच्या शुभेच्छा देत एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामुळं हा सारा प्रकार घडला. ज्यामध्ये तिच्यावर काही प्रश्नांचा भडीमारही झाला. सहसा प्रसादामध्ये कांदा दिसत नाही असं एका युजरनं म्हटलं, तर दुसऱ्यानं नवरात्रोत्सवामध्ये लसूण आणि कांदा वर्ज्य असतो हा नियम तिला आठवून दिला. आपल्यावर होणारी ही टीका पाहून कंगनानं तिची बाजूही सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केली.