Bollywood Actress Disco Shanti: "बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं…", सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्या 'आनंद' (Anand Movie) सिनेमातला डायलॉग, आजही तितकाच प्रसिद्ध आहे. हाच डायलॉग कित्येक व्यक्तिमत्त्वांच्या कथेचं सार मांडतो, ज्यांनी फारच कमी वेळात यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं. साऊथ सिनेसृष्टीतील (South Film Industry) प्रसिद्ध अभिनेत्री (Famous Actress) आणि डान्सर 'डिस्को शांती' (Disco Shanti) असंच एक व्यक्तिमत्त्व.
सिनेमांमध्ये 'आयटम नंबर' हे टायटल जेव्हा रूढ झालं नव्हतं, त्या काळात त्यांनी आपला डान्स आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर प्रेक्षकांशी एक घट्ट नातं निर्माण केलं. तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि ओडिया सिनेमांमध्ये काम केल्यानंतर, डिस्को शांती यांनी अल्पावधीतच सिनेसृष्टीत मोठी प्रसिद्धी मिळवली. पण, लग्नानंतर मात्र, त्यांनी सिनेसृष्टीशी फारकत घेतली. त्यांनी अचानक सिनेमांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
14 वर्षांत 900 हून अधिक सिनेमांचा प्रवास (Actress Disco Shanti Struggle Life)
डिस्को शांती यांचं खरं नाव शांता कुमारी. 1965 मध्ये मद्रास इथे जन्मलेल्या शांती यांनी अगदी लहान वयातच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 1983 ते 1997 या काळात त्यांची कारकीर्द अत्यंत बहरलेली होती, या काळात त्यांनी केवळ विविध भाषांमधील सिनेमांत अभिनयच केला नाही, तर अनेक सिनेमांत विशेष नृत्याचं सादरीकरणही केलं. असं सांगितलं जातं की, आपल्या सुमारे 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 900 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. त्या काळात त्यांनी केलेले डान्स नंबर्स विशेष लोकप्रिय ठरले. डिस्को शांती, फिल्म अभिनेते सी. एल. आनंदन यांच्या कन्या आहेत आणि त्यांची धाकटी बहीण ललिता कुमारी या देखील अभिनेत्री आहेत.
श्रीहरी यांच्याशी बांधली लग्नगाठ (Who Is Disco Shanti?)
1996 मध्ये तेलुगू अभिनेते श्रीहरी यांच्याशी विवाह झाल्यानंतर डिस्को शांती यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा बदल झाला. लग्नानंतर, कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला दोन मुलं आणि एक मुलगी होती. मात्र, त्यांची मुलगी 'अक्षरा' हिचं अवघ्या चार महिन्यांच्या वयात निधन झालं. तिच्या स्मृतीप्रित्यर्थ या कुटुंबानं 'अक्षरा फाउंडेशन'ची स्थापना केली, ही संस्था मुलांचं शिक्षण सुधारण्यासाठी आणि तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत आहे.
पतीच्या निधनानंतर आता फिल्म इंडस्ट्रीत वापसीची चर्चा (Disco Shanti Comeback)
श्रीहरी यांचं 2013 मध्ये निधन झालं. 'आर... राजकुमार' (R... Rajkumar) या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्यानंतर त्यांचं निधन झालं. जवळपास तीन दशकं सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर, 'डिस्को शांती' पुन्हा एकदा चर्चेत आल्या. वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या या अभिनेत्रीनं अलिकडेच इंडस्ट्रीत कमबॅक करण्यावर भाष्य केलं. त्यामुळे कधीकाळी पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डिस्को शांती पुन्हा सिनेमांमध्ये दिसणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
