Bollywood Actress Career Life: सिनेसृष्टी (Bollywood) आणि तिचं ग्लॅमरस जग सर्वांनाच हवंहवसं वाटतं. पण, ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, ही म्हण सिनेसृष्टीला तंतोतंत लागू होते. बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेक अभिनेत्री आल्या, काहींनी नाव कमावलं पण, काहींच्या हाताला यश आलं नाही. तसं पाहायला गेलं तर 90 च्या दशकात सिनेसृष्टीत काम करणं हा अभिनेत्रींसाठी कमालीचा धाडसी निर्णय होता. त्यावेळी लग्न आणि मुलं ही एक अभिनेत्री म्हणून सर्वात मोठी समस्या असल्याचं मानलं जात होतं. पण, काळाबरोबर परिस्थिती बदलली आणि आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या लग्नाचा आणि गरोदरपणाचा चक्क इव्हेंट केला जातो. 

90 च्या दशकात, एक अभिनेत्री होती, जिनं तिच्या करिअरची सुरुवात होताच लग्न केलं. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर तिनं आई होण्याचा निर्णयही घेतला. फोटो दिसणारी अभिनेत्री तीच आहे. जिनं तिचं करिअर यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर तिच्या वैयक्तिक प्राधान्य देत होती. तिनं लग्नही केलं, पण पुढे काही काळातच तिचा घटस्फोट झाला. ही अभिनेत्री तिच्या पहिल्या चित्रपटानंतर सुपरस्टार बनली. असं सांगितलं जातं की, त्याकाळात तिच्या घराबाहेर निर्माते आणि दिग्दर्शकांची रांग लागायची. पण, करिअर यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना गरोदर राहण्याचा निर्णय घेतला. तुम्ही ओळखलं का कोण? 

सिनेसृष्टीत पदार्पण करताच लव्ह स्टोरी सुरू 

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं नाव डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) जिनं तिचा पहिला चित्रपट 'बॉबी'नं (Bobby Movie) इंडस्ट्री गाजवली होती. त्या काळात डिंपल कपाडीया तरुणांच्या गळ्यातील ताईत होती. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या डिंपल कपाडीयाला फक्त 14 व्या वर्षात मोठी प्रसिद्धी मिळाली. इंडस्ट्रीत कित्येक वर्ष घाम गाळून, मेहनत करुनही भल्याभल्या अभिनेत्रींना जे मिळत नाही, ते डिंपलनं पहिल्याच चित्रपटात मिळवलं. 1973 मध्ये राज कपूर यांनी डिंपल कपाडीया यांना त्यांच्या 'बॉबी' सिनेमात कास्ट केलं. या चित्रपटातून त्यांचा मुलगा ऋषी कपूरलाही लाँच करण्यात आलेलं. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डिंपल राजेश खन्ना यांच्या प्रेमात पडली आणि तिनं लग्न केलं. एवढंच काय तर, लग्नानंतर डिंपल कपाडीया यांनी इंडस्ट्रीही सोडून दिलेली. 

16व्या वर्षी लग्न, 25व्या वर्षी घटस्फोट 

डिंपल कपाडियानं 16 व्या वर्षी लग्न केलं. 17व्या वर्षी तिनं मुलीला जन्म दिला. यानंतर डिंपल आणि राजेश खन्ना यांनी दुसरी मुलगी रिंकी खन्नाचा जन्म झाला. कुटुंब आणि मुलांसाठी डिंपल कपाडिया चित्रपटांपासून दूर राहिल्या, परंतु हळूहळू राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यातील तणाव वाढू लागला. परिणामी नऊ वर्षांच्या लग्नानंतर डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचा घटस्फोट झाला. ती भाग्यवान होती की, चित्रपटसृष्टीतील तिचा दुसरा डावही उत्तम होता. तिनं 'सागर' चित्रपटातून पुन्हा चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि यशही मिळवलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Housefull 5 Star Cast Fees: 225 कोटींच्या फिल्मसाठी अक्षय-रितेशनं घेतलं मोठ्ठं मानधन; अभिषेक-नाना पाटेकरांनी किती पैसे घेतले?