Bollywood Actress Daisy Shah Struggle Life: बॅकग्राउंड डान्सर (Background Dancer) म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी ही अभिनेत्री आज बॉलिवूडमधील (Bollywood News) टॉप क्लास हिरोइन्सच्या यादीत सामील झालीय. या अभिनेत्रीनं एका मोठ्या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. बॉलिनूडच्या 'भाईजान'सोबत स्क्रिन शेअर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण हिनं इंडस्ट्रीत पाऊलच ठेवलं, त्याच्या सिनेमातून. कधीकाळी सलमान खानच्या (Salman Khan) मागे बॅकग्राउंड डान्सर म्हणून पडद्यावर झळकणारी अभिनेत्री पुढे त्याच्याचसोबत मुख्य भूमिकेत झळकली आणि प्रचंड लोकप्रिय झाली.
आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की, आम्ही अभिनेत्री डेझी शाह (Actress Daisy Shah) हिच्याबद्दल बोलत आहोत, जिनं सलमान खानसोबत 'जय हो' (Jai Ho) सिनेमातून पदार्पण केलं. अभिनयाच्या जगात पाऊल टाकण्यापूर्वी डेझी शाहनं कोरिओग्राफर आणि मॉडेल म्हणून काम केलं होतं.
बॅकग्राउंड डान्सर ते मुख्य अभिनेत्री असा प्रवास (Background Dancer To Lead Actress Daisy Shah)
सलमान खानची हिरोइन बनण्यापूर्वी डेझी शाहनं बॅकग्राउंड डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं. तिनं सलमान खानच्या 'तेरे नाम' (Tere Naam) या लोकप्रिय सिनेमातील 'लगन लगी' (Lagan Lagi) आणि 'ओ जाना' (O Jaana) या गाण्यांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्याच्यासोबत डान्स केला होता. याव्यतिरिक्त, डेझी शाहनं सिनेसृष्टीतील नामांकित कोरिओग्राफर्सपैकी एक असलेल्या गणेश आचार्य यांच्यासोबत सहाय्यक कोरिओग्राफर म्हणूनही काम केलंय.
2014 मध्ये अभिनेत्रीनं बॅकग्राउंडपासून लाइमलाईटपर्यंतचा प्रवास सलमान खानसोबत 'जय हो' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकून पूर्ण केला. 'जय हो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि फिल्ममध्ये डेझी आणि सलमान यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. यानंतर डेझी शाह 'हेट स्टोरी 3' आणि 'रेस 3' यांसारख्या फिल्म्समध्ये झळकली. पण, या फिल्म्सना 'जय हो' इतकं यश मिळालं नाही.
साऊथ आणि गुजराती फिल्म्समध्येही केलंय काम
'जय हो' (Jai Ho) सिनेमापूर्वी, डेझी शाहनं साऊथ सिनेसृष्टीत आपलं नशीब आजमावलं होतं. 2011 मध्ये त्यांनी 'भद्रा' (Bhadra) या कन्नड सिनेमात आणि त्यानंतर 'बॉडीगार्ड' (Bodyguard) मध्ये काम केलं. दरम्यान, डेझी शाहनं आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात साऊथ सिनेमांपासूनच केली होती. साऊथच्या सिनेमांनंतर, सलमान खानसोबतच्या 'जय हो' या पदार्पणाच्या सिनेमाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये अधिक लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी गुजराती सिनेसृष्टीतही काम केलं. 'गुजरात 11' (Gujarat 11) या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अभिनयाव्यतिरिक्त, डेझी शाहनं मॉडेल म्हणूनही काम केलं. विशेष म्हणजे, या अभिनेत्रीची सध्याची एकूण संपत्ती (नेट वर्थ) अंदाजे 185 कोटी रुपये इतकी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
